Pune : आमदार मेधा कुलकर्णी यांच्या मुलाकडून आंदोलनकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- मेधा कुलकर्णी यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांकडून ठिय्या आंदोलन सुरु असताना त्याच्या मुलाने आंदोलनकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करीत आंदोलक आक्रमक झाले. यावेळी त्यांनी मेधा कुलकर्णी यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

आमदारांच्या घरासमोर बसून मराठा समाजाला आरक्षण मिळणार असेल, तर त्यांनी आमच्या घरापुढे बसावं. पण आमच्या घरासमोर केले जाणारे ठिय्या आंदोलन म्हणजे केवळ ‘स्टंट’ असल्याचं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनी केले होते. आता त्यांच्या मुलाने शिवीगाळ केल्याचा प्रकार झाल्यामुळे आमदार मेधा कुलकर्णी आणखी अडचणीत सापडल्या आहेत.

कुलकर्णी यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलक आक्रमक झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

https://www.youtube.com/watch?v=m5BL0ITBSRg&feature=youtu.be

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.