_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune : पोलीस कारवाई न करण्यासाठी 16 हजारांची लाच मागणाऱ्यावर एसीबीची कारवाई

धनंजय अधिकारी, असे कारवाई झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. : ACB action against those who demanded bribe of Rs 16,000 for not taking police action

एमपीसी न्यूज – पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अदखलपात्र (एनसी) गुन्ह्यातील तक्रारदारावर पोलीस कारवाई न करण्यासाठी एका खासगी व्यक्तीने 16 हजारांची लाच मागितली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) संबंधित व्यक्तीवर कारवाई केली आहे.

धनंजय अधिकारी, असे कारवाई झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात एक अदखलपात्र तक्रार दाखल आहे.

त्यामध्ये तक्रारदारावर कारवाई न करण्यासाठी पोलिसांच्या वतीने एका खाजगी व्यक्तीने तक्रारदाराकडे 25 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती 16 हजार रुपये घेण्याचे ठरले.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली.

एसीबीने सापळा रचून खाजगी व्यक्तीवर कारवाई केली. याबाबत भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 अ नुसार वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई झालेला व्यक्ती पोलिसांचा खाजगी वसुली पंटर असल्याची चर्चा आहे. कारवाई झाल्यानंतर वसुली पंटर पळून गेला आहे.

यामुळे संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकारी चांगलेच धास्तावले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.