Pune : पन्नास हजाराची लाच मागणारा तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज- घेतलेल्या जमिनीची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी तसेच इतर सर्वे नंबरच्या उताऱ्यावर नोंदी करण्यासाठी 70 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 50 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि. 13) करण्यात आली.

सचिन तुकाराम जाधव (वय 39, तलाठी- सजा सुसगाव,ता मुळशी,जि पुणे वर्ग 3) असे लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याने नाव आहे. या प्रकरणी २८ वर्षीय तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

_MPC_DIR_MPU_II

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी घेतलेल्या 20 गुंठे जमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद घेतल्याचा मोबदला म्हणून 20 हजार रुपये व त्या व्यतिरिक्त इतर सर्वे नंबरच्या उताऱ्यावर नोंदी करण्यासाठी 50 हजार अशी मिळून तक्रारदार यांच्याकडे 70 हजार रुपयांची लाचेची मागणी आरोपी सचिन जाधव याने केली होती. तडजोडीअंती 50 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेची रक्कम स्वीकारताना आरोपी जाधव याला रंगेहाथ पकडले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सुनील बिले व रतेश थरकार यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.