Pune Accident : वाजपेयी पुलावर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; दुचाकीचे दोन तुकडे

एमपीसी न्यूज : कर्वेनगर रोडवरील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उड्डाणपुलावर (Pune Accident) एका दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिली. हि धडक इतकी जोरात होती, कि या वाहनाच्या धडकेत दुचाकीचे दोन तुकडे होऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, मृत्यूस कारणीभूत असलेला वाहनचालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. तसेच, हा अपघात पुलावरील कठड्याच्या धक्क्यात झाला असल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे.

अधिक माहितीनुसार, डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीत शुक्रवारी दिनांक 23 सप्टेंबर रोजी संगमेश्वर सिद्धराम साखरे (वय27 वर्ष, रा. डीमार्ट जवळ, मूळ – इम्पेरियल अपार्टमेंट सोलापूर उत्तर) हे आपल्या मोपेड गाडीवरून (क्रमांक MH 12,QZ 1738) डेक्कनकडे चालले होते. दुपारी सव्वातीनच्या सुमारास नळस्टॉप, कर्वे रोड कल्याण ज्वेलर्स शेजारील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उड्डाणपुलावर कोणत्यातरी अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली.

प्रवासादरम्यान साखरे यांनी हेल्मेट परिधान न केल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहनावरील चालकाविरुद्ध IPC कलम- 304 अ,279,427, मोटर वाहन कायदा-134 (1) ब, 119/177 प्रमाणे कायदेशीर तक्रार नोंदवण्यात आली आहे.

Pune : हैदराबाद ते पुणे प्रवासात महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न; खाजगी ट्रॅव्हल्सच्या चालकाला अटक

या प्रकरणाची दुसरी बाजू म्हणजे हा अपघात वाहनाच्या धडकेत (Pune Accident) झाला आहे, कि उड्डाणपुलाच्या कठड्याला धक्का लागून झाला आहे? याचा शोध पोलीस करत आहेत. कारण भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उड्डाणपुल सुरु केल्यापासून हा पहिलाच अपघात आहे. तसेच, यावरील पंथ दिव्याचे खांब समांतर बाजूस नाहीत. त्यामुळे अपघाताचा धोका होऊ शकतो, असा आरोप या पूर्वीच नागरिकांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.