BNR-HDR-TOP-Mobile

Pune : खासगी बसच्या धडकेत अज्ञात वृद्धाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- खासगी बसच्या खाली सापडून एका साठ वर्षाच्या अज्ञात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. ५) रात्री आठच्या सुमारास नवी पेठ परिसरात गांजवे चौकात घडला.

या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी बसचालक दिलीप विठ्ठल चव्हाण याला ताब्यात घेतले आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

या बाबतची माहिती अशी की, द्वारकधीश ट्रॅव्हलची बस दांडेकर पूलकडून शिवाजीनगरच्या दिशेने जात असताना गांजवे चौकात वृद्धाला बसने धडक दिली. यामध्ये बसच्या पुढच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. मृत वृद्धांची ओळख पटलेली नसून
या वृद्धाच्या अंगात पांढरा शर्ट व पांढरा पायजमा आहे.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3