Pune Accident : शिवाजीनगर येथे दुध वाहतूक टेम्पोला अपघात, रस्त्यावर दुधाचे पाट

एमपीसी न्यूज – पुण्यात शिवाजीनगर भागात राहुल टॉकीज समोरील उड्डाणपूलावर आज (शनिवार) पहाटे दुधाची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात (Pune Accident) झाल्याने वाहनचालक जखमी झाला. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात दूध रस्त्यावर सांडल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्ता दुभाजकावरील विजेच्या दिव्याच्या खांबाला धडकला. त्यामुळे दिव्याचा खांब जमीनदोस्त झाला.

Talegaon Dabhade : शासकीय फलकावर बांधकाम व्यावसायिकाच्या जाहिराती

पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाला या अपघाताबाबत (Pune Accident) कळविण्यात आले. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुध व ऑईल सांडले असल्याने अग्निशमन दल दाखल झाले असून पाण्याचे फवारे मारून रस्ता साफ करण्याचे काम सुरू आहे.

नागरिकांनी सद्यस्थितीत सदर रस्त्याने वाहने चालविताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन अग्निशमन दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.