Pune Accident News: नियंत्रण सुटल्याने डेक्कन परिसरातील गरवारे पुलावरुन कार भुयारी मार्गात कोसळली

एमपीसी न्यूज – मोटारीतून जात असताना अचानक कुत्रे आडवे आल्याने  वाहनचालकाने ब्रेक दाबल्यामुळे नियंत्रण सुटले. त्यामुळे  मोटार गरवारे पुलावरुन  भुयारी मार्गात कोसळल्याने अपघात घडला. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाही. ही घटना काल मध्यरात्री 12 वाजून 10 मिनिटांनी घडली. 

डेक्कन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मनोज काळगुंदे (वय 24, रा. पाषाण) आणि इतर तिघे मित्र जंगली महाराज रोडवरील हॉटेलमध्ये जेवायला आले होते.जेवण झाल्यानंतर  घरी जात असताना गरवारे पुलाजवळ  त्यांच्या मोटारीसमोर अचानक एक कुत्रे आडवे आले.

त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा मोटारीवरील ताबा सुटला. त्यामुळे मोटार  कठडा तोडून गरवारे अर्ध भुयारी मार्गात कोसळली. मोटारीचा आवाज ऐकून लोक धावत गेले. त्यांनी मोटारीतील चौघांना बाहेर काढले. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.