Pune Accident News : मुंबईकडून बेंगलोरच्या दिशेने जाणार्‍या खाजगी बसला बावधन येथे अपघात; आठ जखमी

एमपीसी न्यूज – शर्मा ट्रॅव्हल्सची मुंबईतून पुण्यामार्गे बंगळुरूकडे जाणारी खाजगी प्रवासी बस  (Pune Accident News ) चांदणी चौक परिसरात रस्त्यावरून कोसळून अपघात झाला आहे. हा अपघात शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला.या आपघातामध्ये आठ ते दहा प्रवासी जखमी झाले आहेत. बावधन येथे मुख्य रस्त्यावरुन सेवा रस्त्यावर जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस 15 ते 20 फूट खाली कोसळली.

 

Maharshtra News : प्रशिक्षणार्थी विमान बालाघाट जिल्ह्यातील जंगलात कोसळले, दोन पायलट ठार

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. ही बस बायपासवरून साधारण 15 फूट खाली कोसळली आणि पलटी झाली. अपघातग्रस्त बसमध्ये 35 प्रवासी प्रवास करत होते. या बस अपघातात आठ प्रवासी जखमी झालेत. जखमींना तातडीने उपचारासाठी कोथरुड परिसरातील रुग्णालयात हलविण्यात आले.

 

 

दरम्यान, या अपघातामुळे चौंदणी चौक परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी   (Pune Accident News ) अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून बाजूला केले. जवळपास अर्ध्या तासानंतर या ठिकाणची वाहतूक सुरळीत झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.