Pune Accident News : स्वारगेट आणि हडपसर येथील रस्ते अपघातात दोघांचा मृत्यू

एमपीसीन्यूज : पुणे शहरातील स्वारगेट आणि हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात ज्येष्ठ नागरिकासह दोघांचा मृत्यू झाला. जगन्नाथ श्रीपती तोडकर आणि दत्तात्रय मारवाळ, अशी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीची नावे आहेत.

पहिल्या घटनेत जगन्नाथ तोडकर (वय 75) हे स्वारगेट परिसरातील सावरकर चौकातून रस्ता क्रॉस करत होते. यावेळी भरधाव वेगात आलेल्या एका रिक्षाने त्यांना धडक दिली. या अपघातात तोडकर गंभीर जखमी झाले होते.ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना 18 ऑक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.

स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या एका घटनेत हडपसर सासवड जकात नाक्याजवळून पायी जाणाऱ्या दत्तात्रय मारवाळ यांना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. 20 ऑक्टोबरला अपघात झाला. गंभीर जखमी झाल्याने मारवाळ यांचा मृत्यू झाला.

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.