Pune accident : पुण्यात देवदर्शनासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या गाडीला अपघात, दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी

एमपीसी न्यूज : पुण्यातील सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. नारायणपूर या ठिकाणी देवदर्शनासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या गाडीला हा अपघात झाला.(Pune accident) चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन मुलींचाही समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी पुण्यातील एमआयटी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत.

गौरव ललवाणी (वय 19) आणि रचित मोहता (वय 18) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. तर इतर पाच जण जखमी आहेत.. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

RSS Dehu : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देहू गट संभाजीनगर शाखेचा शस्त्र पूजनाचा कार्यक्रम संपन्न

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, नारायणपूर येथील सासवड कापूरहोळ रस्त्यावर हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सासवड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.(Pune accident) त्यांनी घटनेचा पंचनामा करत जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात पाठवले. दरम्यान हा अपघात इतका भीषण होता की चार चाकी गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांना धडक देत चार वेळा पलटी झाली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.