Pune Accident : मुलीला पोलिस भरतीसाठी घेऊन आलेल्या पित्याचा अपघातात जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ग्राऊंड (Pune Accident) येथे मागील महिन्याभरापासून राज्यातील अनेक भागातून पोलिस भरतीसाठी तरुण आणि तरुणी येत आहेत. त्याच दरम्यान आज पोलीस भरतीच्या ठिकाणी मुलीला सोडून चहा पिण्यास गेलेल्या पित्याचा रस्ता ओलांडताना भरधाव वाहनांने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला.  सुरेश सखाराम गवळी (वय 55) असे मृत्यू झालेल्या पित्याचे नाव असून ते मूळचे नाशिक येथील रहिवासी आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक येथील सुरेश सखाराम गवळी हे रिक्षा चालक असून पत्नी आणि 22 वर्षीय मुलीला घेऊन काल रात्री 10 वाजता पुण्यात आले होते. आज त्यांच्या मुलीचे ग्राऊंड होते.

पुण्यात त्यांचे नातेवाईक नसल्याने शिवाजीनगर मुख्यालयाच्या बाहेरील फुटपाथवर रात्री ते कुटुंबीय झोपले. त्यानंतर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांनी मुलीला ग्राऊंडच्या गेटवर सोडले. त्यानंतर सखाराम गवळी हे पत्नीला म्हणाले की, मी चहा पिऊन येतो.

Govt Employee Strike : सरकारी कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम, उद्यापासून 18 लाख कर्मचारी संपावर

तेथून काही अंतर पायी चालत गेल्यावर रस्ता ओलांडत असताना भरधाव वाहनाने सखाराम यांना जोरात धडक दिली. तेथून काही अंतरावर सखाराम गवळी यांची पत्नी देखील होती. सर्व लोक घटनेच्या ठिकाणी जमलेले पाहून त्या नेमक काय झाले हे पाहण्यासाठी गेल्यावर सखाराम गवळी यांच्या पत्नी रेश्मा यांना त्याच्या पतीचा अपघात झाल्याचे दिसून आले.

सखाराम हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथील उपनिरीक्षक अर्जुन नाईकवाडे यांनी दिली. आपल्या गरीबीसोबत झुंज देत (Pune Accident) आपल्या मुलीला पोलिस बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पित्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.