Pune : खुनाच्या गुन्ह्यात वर्षभरापासून फरार असलेल्या आरोपीला अटक

तो सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या एका गुन्ह्यात मागील वर्षभरापासून फरार  होता.  ; Accused arrested for absconding in murder case

एमपीसीन्यूज : खून, खुनाचा प्रयत्न, आर्म ॲक्ट व मारामारी असे गंभीर गुन्हे नावावर असलेला आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेला सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा यूनिट एकच्या पोलिसांनी जेरबंद केले.

किरण विठ्ठल शिंदे (वय 18 रा. नऱ्हे) असे या सराईताचे नाव आहे. तो सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या एका गुन्ह्यात मागील वर्षभरापासून फरार  होता.

फरार असलेल्या या आरोपीचा शोध सुरू असताना तो आंबेगाव परिसरातील एका इराणी चहाच्या हॉटेल जवळ येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा यूनिट एकचे पोलीस कर्मचारी अमोल पवार यांना खबऱ्याकडून मिळाली होती.

त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी घेणे आणि खात्री करून त्यांनी आरोपीला जेरबंद केले. 19 ऑगस्ट 2019 रोजी आरोपीने पोलिसांच्या हद्दीत एकाला जबर मारहाण करत हातात कोयता घेऊन दहशत निर्माण केली होती.

यातील इतर आरोपीना पोलिसांनी अटक केली होती. परंतु, शिंदे मागील एक वर्षापासून फरार होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.