Pune: भोर तालुक्यात पॅरोलवर सुटलेल्या आरोपीची निर्घृण हत्या

Pune: accused released on parole Brutal murder in Bhor taluka भोर तालुक्यातील शिवरे येथे तो मामाकडे आला होता. यावेळी आरोपींनी पूर्ववैमनस्यातून प्रवीण मोरेवर कोयत्याने वार करून त्याला जागीच ठार केले.

एमपीसी न्यूज- येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटलेल्या आरोपीची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. भोर तालुक्यातील शिवरे गावात ही घटना घडली. प्रवीण सत्‍यवान मोरे (वय 25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. राजगड पोलिस ठाण्यात याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मृत प्रवीणचे मामा दशरथ डिंबळे यांनी राजगड पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण मोरे हा एका खुनाच्या गुन्ह्यात 2017 पासून येरवडा कारागृहात कैदेत होता. तो 3 जून रोजी 45 दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला होता.

भोर तालुक्यातील शिवरे येथे तो मामाकडे आला होता. यावेळी आरोपींनी पूर्ववैमनस्यातून प्रवीण मोरेवर कोयत्याने वार करून त्याला जागीच ठार केले. अधिक तपास पोलीस अधिकारी दत्तात्रय दराडे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.