Pune : बारावीच्या पहिल्याच पेपरला 82 कॉपी बहाद्दरांवर कारवाई

एमपीसी न्यूज – बारावीच्या परीक्षेला मंगळवार (दि. 18) पासून सुरुवात झाली आहे. परीक्षेची सुरुवात इंग्रजी विषयाने झाली आहे. पहिल्याच पेपरला राज्यातील नऊ विभागांमध्ये 82 कॉपी बहाद्दरांवर कारवाई करण्यात आली आहे. कॉपीची सर्वात कमी प्रकरणे नागपूर आणि कोल्हापूर विभागात तर सर्वाधिक प्रकरणे लातूर विभागात आढळली आहेत. कोकण आणि मुंबई विभागात एकही कॉपीचे प्रकरण समोर आले नाही. पुणे विभागात सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत बारावीची परीक्षा घेण्यात येत आहे. 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत तीन हजार 36 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षेसाठी 9 हजार 923 कनिष्ठ महाविद्यालयांमधून एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये 8 लाख 43 हजार 552 विद्यार्थी तर 6 लाख 61 हजार 325 विद्यार्थिनी परीक्षा देत आहेत.

परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आला बसावा, यासाठी महामंडळामार्फत राज्यभरात एकूण 273 भरती पथके नेमण्यात आली आहेत. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षाता समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. विशेष महिला भरारी पथक, विशेष भरारी पथक यांचीही स्थापना करण्यात आली आहे. इंग्रजी आणि गणित विषयांच्या परीक्षांच्या दिवशी बैठे पथक कार्यान्वित असणार आहे.

पहिल्या पेपरच्या दिवशी पुणे (6), नागपूर (4), औरंगाबाद (7), कोल्हापूर (4), अमरावती (9), नाशिक (18), लातूर (34) या विभागांमध्ये एकूण 82 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई आणि कोल्हापूर विभागीय मंडळात एकही गैरप्रकार आढळून आलेला नाही. गैरमार्गाविरुद्धचा लढा हे अभियान परीक्षा कालावधीत सुरूच राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.