Pune : लॉकडाऊनमध्ये ‘दारूबंदी’चे उल्लंघन करणाऱ्या 835 जणांवर कारवाई; एक कोटी 97 लाखाचा मुद्देमाल जप्त

Action against 835 people for violating 'alcohol ban' in lockdown; One crore 97 lakh seized : लॉकडाऊनमध्ये 'दारूबंदी'चे उल्लंघन करणाऱ्या 835 जणांवर कारवाई; एक कोटी 97 लाखाचा मुद्देमाल जप्त

एमपीसीन्यूज : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लॉकडाउन लागू करण्यात आला होता. असे असतानाही पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात या काळात चोरून लपून दारूची विक्री होत होती. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी मार्च ते जून या कालावधीत तब्बल 835 जणांवर कारवाई केली. या सर्व आरोपींना  अटक करुन एक कोटी 97 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कारवाई केलेल्या आरोपींमध्ये देशी-विदेशी, हातभट्टीची दारू बेकायदा विक्री करणाऱ्यांचा समावेश आहे. दारूबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

पुणे ग्रामीण पोलीस हद्दीत एकूण 32 पोलीस ठाणी आहेत. या सर्व पोलिस स्टेशनच्या हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.

ग्रामीण पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अनेक भागात हातभट्टी दारू तयार करू ती विकण्याचे प्रमाण वाढले होते. याशिवाय कोरोना काळात बंदी असतानाही अनेक दारू विक्रेते चोरून दारू विकत होते. या सर्वांवर ही कारवाई करण्यात आली.

मार्च ते जून या कालावधीत याप्रकरणी एकूण 908 गुन्हे दाखल करण्यात आले. यातील 835 आरोपींना अटकही करण्यात आली. या कारवाई दरम्यान ग्रामीण पोलिसांनी एक कोटी 97 लाख 12 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.