Pune : लॉकडाऊनचे नियम मोडणारे पुन्हा एकदा रडारवर, चार दिवसांत 452 नागरिकांवर कारवाई

Action on 452 citizens in four days, once again on the radar for breaking the rules of lockdown कंटेनमेंट झोनमधून वाहनांची ने-आण करणे, मास्क न वापरणे, रात्री दहानंतर रस्त्यावर संचार करणाऱ्यांचा यांचा यामध्ये समावेश आहे. 

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यानंतर शहरात पुन्हा एकदा वर्दळ वाढली आहे. नागरिकांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे कोरोनाचा प्रकोप पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुणे शहर पोलिसांनी नियमांचा भंग करणाऱ्या विरोधात पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात केली.

कोरोना साथप्रतिबंधक कायद्यानुसार घालून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या आणि लॉकडाउनच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 452 नागरिकांवर पुणे पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये कंटेनमेंट झोनमधून वाहनांची ने-आण करणे, मास्क न वापरणे, रात्री दहानंतर रस्त्यावर संचार करणाऱ्यांचा यांचा यामध्ये समावेश आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांनी शहरात 94 ठिकाणी नाकाबंदी केली आहे. 85 अधिकारी आणि 337 कर्मचारी या नाक्यावर काम करणार आहेत. एक जुलैपासून आतापर्यंत विना मास्क फिरणाऱ्या 102 जणांवर, विनापरवानगी फिरणाऱ्या 69 जणांवर, रात्री दहानंतर रस्त्यावर फिरणाऱ्या 97 जणांवर, संचार बंदीचे उल्लंघन करणाऱ्या 184 दरांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय ट्रिपल सीट, सिग्नल जम्पिंग, रॉंग साईड वाहन चालवणे, फुटपाथवर वाहन चालवणे अशा 500 हुन अधिक जणांवर कारवाई करण्यात आली.

अजूनही कोरोनाचा धोका टळला नसून नागरिकांनी आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी मास्क घालावे आणि सामाजिक अंतर पासुन स्वयंशिस्त पाळावी. गरजेच्या कामासाठी नागरिकांनी घराबाहेर पडावे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता आणि नागरिकांनी घ्यावी असे आवाहन पोलीस आयुक्त के वेंकटेशम यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.