Pune: मास्क न वापरणाऱ्या 22 जणांवर धडक कारवाई; आठ हजारांचा दंड वसूल

Pune: Action taken against 22 people for not wearing masks; A fine of Rs 8,000 was recovered

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न लावणाऱ्या 22 जणांवर धडक कारवाई करून 8 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई करण्याचे अधिकार केवळ आरोग्य निरिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनाच देण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली.

पुणे शहरात सार्वजनिक ठिकाणी, खाजगी आणि सरकारी कार्यालयात नागरिकांना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा 500 रुपये रूपये दंड आकारण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. दंड न भरल्यास कलम 188 नुसार पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे बाहेर पडताना नागरिकांना मास्क घालणे बंधनकारक आहे.

कोंढवा येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालय परिसरात 8 जणांवर, नगररोड, येरवडा येथे प्रत्येकी 4 जणांवर तर वारजे कर्वेनगर परिसरात 6 जणांवर ही कारवाई करण्यात आली. पुणे महापालिकेतर्फे कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. आगामी काळात जास्तीत जास्त कोरोनाच्या चाचण्या करण्यात येणार आहे.

सध्या शहरात कोरोनाचे 13 हजारांच्या पुढे रुग्ण गेले आहेत. सर्वांनी मास्क वापरून सहकार्य करावे. दंड आकारण्याची वेळ येऊ देऊ नये, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.