Pune: लॉकडॉऊनमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 450 पुणेकरांवर कारवाई

Pune: Action taken against 450 Pune residents for violating rules in lockdown मागील दोन दिवसात परवानगी न घेता संचार करणाऱ्या 288 जणांवर कारवाई करण्यात आली.

एमपीसी न्यूज- पुणे शहरात सध्या कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा एकदा लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे. परंतु या लॉकडाऊनमध्येही अनेक जण सर्रास रस्त्यावर फिरताना दिसतात. त्यामुळे अशा नागरिकांविरोधात पुणे पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. संचारबंदीचा आदेश मोडणाऱ्या, मास्क न लावता करणाऱ्या तब्बल 450 पुणेकरांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. यासाठी 261 पोलीस अधिकारी आणि 1600 हून अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

मागील दोन दिवसांपासून संचार बंदीचा आदेश मोडणाऱ्यांवर तीव्र कारवाई करण्यात येत आहे. मागील दोन दिवसात परवानगी न घेता संचार करणाऱ्या 288 जणांवर कारवाई करण्यात आली.

मास्कचा वापर न करणाऱ्या 85 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर या कालावधीत पोलिसांनी 185 वाहनेही जप्त केली आहेत. दरम्यान, शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून नागरिकांनी त्याचे पालन करावे, असे आवाहन सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.