Pune : वनराज आंदेकर खून प्रकरणी 22 आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई

एमपीसी न्यूज : पुणे पोलिसांनी (Pune) माजी नगरसेवक वनराज सूर्यकांत आंदेकर यांच्या खून प्रकरणी अटक आरोपींवर आता मोठी कारवाई सुरू केली आहे. प्रकरणात 22 व्यक्तींचा समावेश असून या आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणात कुख्यात गुन्हेगार सोमा गायकवाड, वनराजची बहीण, तिचा नवरा आणि तीन अल्पवयीन मुले यांचाही समावेश आहे.

वनराजचे वडील सूर्यकांत उर्फ ​​बंडू राणुजी आंदेकर (वय 68) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

पुण्यात सहा ते सात टू व्हीलरवरुन तेरा ते चौदा जण आले आणि त्यांनी थेट वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यावर गोळीबार करत कोयत्यानं वार केले. हल्ला करण्यापूर्वी आरोपींनी अगोदर चौकातील लाईटही घालवली होती. शिवाय आंदेकर एकटेच असल्याचा अंदाज घेत आरोपींनी आंदेकर यांच्यावर हल्ला केला.

Pune : आर्थिक वादातून गोळीबार; जमीन व्यापाऱ्याकडून 2 आयात बंदुक, 200 हून अधिक गोळ्या जप्त

घरात कार्यक्रम असल्यामुळे आंदेकर यांच्यासोबत इतर सहकारी नव्हते. नेमकी हीच संधी साधून दुचाकीवरून आलेल्या तेरा ते चौदा जणांनी आधी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांच्यावर कोयत्यानं वारही केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना तातडीनं (Pune) रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारांपुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं, हल्लेखोर घटनास्थळावरुन फरार झाले. त्यानंतर घटनास्थळी एकच गर्दी झाली. सध्या हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं असून पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share