Pune : अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचा नादच खुळा; बस चालकाची तब्येत बिघडली म्हणून स्वत: चालवली बस

एमपीसी न्यूज : संकट कोणत्याही काळी कधीही येऊ शकते. परंतु, या संकटावर मात (Pune)  करणारे नेहमीच हीरो ठरतात. अशाच एका संकटावर मात करत मराठी कलाकार संकर्षण कऱ्हाडे केवळ चित्रपट आणि नाट्यातलाच नव्हे तर रियल लाईफ हीरो ठरला आहे. संकर्षण कऱ्हाडे आपल्या नाट्य मित्रांसाठी देवासारखा धावून आला आहे. ड्रायव्हरची तब्येत बिघडली म्हणून संकर्षणने स्वत: चालक होत लोणावळा पर्यंत बस चालवत सर्वांना थक्क केले आहे. 

तर, घडले असे की कोथरूडच्या नाट्याचा प्रयोग रात्री साडेबारा वाजता संपला. जेवण आटपून सर्व कलाकार 2 वाजता मुंबईच्या प्रवासाला निघाले. एवढ्यातच त्यांच्या बसचा चालक प्रवीण याची तब्येत अचानक बिघडली. चालकच आजारी पडल्याने सगळच थांबलं. पण संकर्षण थांबला नाही. त्याने चालकाला मागे झोपवले आणि स्वतः ड्राइवर सीटवर बसला ते थेट लोणावळ्यापर्यंत बस चालवली.  लोणावळ्याला चालक प्रविणला बरे वाटले तेव्हा संकर्षणने गाडी (Pune) थांबवून त्याच्या हाती बस सुपूर्द केली.

Pune : ऋतुराज गायकवाड उद्या अडकणार विवाहबंधनात; पुण्यात होणार विवाह

हा संपूर्ण प्रसंग अभिनेते प्रशांत दामले यांनी आपल्या फेसबवुकवर शेयर केला. यामुळे संकर्षणचे चाहते तसेच सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.