Pune: शहरातील 21 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत लॉकडाऊनचे अतिरिक्त निर्बंध लागू

 एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन 3.0 साठी पुणे पोलीस आयुक्तालयाने नवीन आदेश काढले असून त्यानुसार यापूर्वीच्या आदेशांना 17 मेला मध्यरात्रीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याखेरीज शहरातील 23 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अतिसंक्रमणशील भागात अतिरिक्त निर्बंध लागू करण्यात येत असल्याचा आदेश पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी काढला आहे.

अतिरिक्त निर्बंध लागू असलेले प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर संक्रमणशील क्षेत्रात उपरोक्त मनाई आदेश खालील बाबतीत लागू होणार नाहीत. पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील अतिरिक्‍त निर्बंध लागू असलेले प्रतिबंधित क्षेत्रांची माहिती आदेशात देण्यात आली आहे.

  • ज्या बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी कामगार उपलब्ध असून बाहेरून कामगार आणण्याची गरज नाही अशा प्रकल्पांना बांधकाम चालू ठेवणेवाबत प्रशासानाकडून परवानगी राहील.
  • मॉन्सून पूर्व आपत्ती निवारण संबंधित शासनाच्या विविध विभागांकडून करण्यात येणारी कार्यवाही
  • मेट्रो प्रकल्प
  • रोड/ गल्ली मधील जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीखेरीज इतर सामग्रीच्या विक्रीची जास्तीत जास्त पाच दुकाने चालू ठेवण्यास परवानगी राहील.
  • तरतुदी अन्वये करावयाच्या कार्यवाहीबाबत संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी यांचे समन्वयाने पर्यवेक्षण राहील.
  • जीवनावश्यक वस्तू व सेवा संबंधित तसेच इतर सर्व दुकाने सकाळी 10 ते सायं 6 वाजेपर्यंत चालू ठेवता येतील.
  • घरपोच दुध वितरण सेवा सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत व दुकानातील दूध विक्री निर्धारित कालमर्यादेत करण्यास परवानगी राहील.
  • आरोग्य विभागाने सूचित केलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांची (उदा. मास्क, हण्डग्लोव्हज, फेसशिल्ड, सॅनिटायझर यांचा वापर तसेच शारीरिक अंतर ठेवणे) अंमलबजावणी करणे सर्व संबंधितांना अनिवार्य राहील.
  • कोणत्याही कारणास्तव संचार करणाऱ्या नागरिकांच्या हालचालींवर महाराष्ट्र शासनाचे निर्देशाप्रमाणे सायं. 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंधन असणे आवश्यक आहे. सबब, या सवलतींचा लाभ घेणाऱ्या सर्व संबंधितांनी सायं 7 वाजण्यापूर्वी आपल्या वास्तव्याच्या ठिकाणी पोहचणे अनिवार्य राहील.
  • 65 वर्षावरील व्यक्ती, दुर्धर आजाराने ग्रस्त, गर्भवती स्त्रिया, 10 वर्षाखालील मुले यांनी केवळ अत्यावश्यक कारण व आरोग्यविषयक बाबींकरीता घराबाहेर पडावे. किंबहुना घरीच थांबण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे.
  • प्रतिबंधित क्षेत्रात यापूर्वी निर्देशित केल्याप्रमाणे जीवनावश्यक वस्तू व सेवा यांची विक्री केंद्रे सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत चालू ठेवण्यास परवानगी राहील. तसेच या प्रतिबंधित क्षेत्रात यापूर्वी अंमलात असलेले अतिरिक्‍त निर्बंध कायम राहतील.
  • या पूर्वीच्या मनाई आदेशांतर्गत सवलत दिलेल्या व्यक्‍ती व सेवांखेरीज इतरांना प्रतिबंधित क्षेत्र व उर्वरीत क्षेत्र यामधील परस्पर प्रवासास पूर्णपणे मनाई राहील.
  • सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्‍ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188, साथरोग अधिनियम 1897 मधील तरतुदी व प्रचलित कायद्यांन्वये शिक्षेस पात्र राहील.

आयुक्तालयातील काही विशिष्ट क्षेत्रात आवश्यकतेनुसार अतिरिक्‍त निर्बध लागू करावयाचे असल्यास त्याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील, असे डॉ. शिसवे यांनी आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.