BNR-HDR-TOP-Mobile

Pune : अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांना राज्य शासनाचा ‘वनश्री पुरस्कार’ जाहीर

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पुणे पोलीस आयुक्तालयातील उत्तर विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांना महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. वृक्षारोपण, पर्जन्य जलसंचय, शेततळी यामध्ये लोकसहभागातून भरीव काम केल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे.

राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक एकचे 2016-18 समादेशक असताना फुलारी रामटेकडी येथे कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी चार हजार रोपांचे रोपण केले होते. त्यातील 92 टक्के रोपांचे आज वृक्ष झाले आहेत. या कालावधीत त्यांनी वडाचीवाडी वृक्षलागवडीसाठी दत्तक घेतले. गावामध्ये जलसंधारण मोठ्या प्रमाणात झाल्याने तिथे पक्ष्यांचा अधिवास देखील वाढला आहे.

  • वडाचीवाडी गावात सध्या 26 जातींचे 1 हजार 150 पक्षी असल्याचे एका पक्षी गणनेत समोर आले आहे. फुलारी यांच्या सक्रिय सहभागातून ही नैसर्गिक साधनसंपत्ती वाढली आहे. या कार्याची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांना वनश्री पुरस्कार जाहीर केला. एक लाख रुपये, प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.
HB_POST_END_FTR-A2

.