Pune : अधिकची वर्गणी नाही दिल्यास धंदा करू देणार नाही; चहा टपरीधारकास दिली धमकी

एमपीसी – गणेशोत्सव अर्ध्यावारी आला असताना अजूनही गणेश मंडळांच्या वतीने वर्गणी गोळा करण्याचे काम सुरु असून, जबरदस्तीने अधिकची वर्गणी मागण्याचे प्रकार वाढीस लागताना दिसत आहेत. मनमानी पद्धतीने वर्गणी मागणा-या आरोपींना लष्कर पोलिसांनी अटक केली आहे.

Pimpri : ॲड. संजय माने यांची कास पठार समितीवर कायदा सल्लागार म्हणून निवड

15 ऑगस्ट चोक, एमजी रोड, कोंढवा (Pune) येथे टपरीधारक चहाच्या टपरीवर चहा विकत असताना, निलेश दशरथ कणसे (वय 39) जान महम्मद स्ट्रीट, कँप, पुणे आणि अविनाश राजेंद्र पंडीत ( वय- 32 ) एम.जी. रोड, शिपी आळी, पुणे यांनी टपरीधारकास वर्गणी मागितली. टपरीधारक स्वखुशीने 151 रुपये देण्यास तयार झाले. परंतु आरोपींनी त्यांना बळजबरीने 1000 रुपये मागितले.

त्यावेळी टपरीधारकाने इतकी वर्गणी देण्यास नकार दिला. त्यावेळी आरोपींनी आपसात संगनमत करून टपरीधारकाच्या अंगावर धावून जाऊन, शिवीगाळ व मारहाण केली. तसेच तुझा चहाचा धंदा कसा चालतो ते बघतो अशी धमकी दिली. याबाबत लष्कर पोलीस स्टेशन येथे १५ ऑगस्ट गणपती मंडळाच्या निलेश दशरथ कणसे व अविनाश राजेंद्र पंडीत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.