BNR-HDR-TOP-Mobile

Pune : रेल्वे स्थानकात आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या मेडिकल कर्मचाऱ्यांनी पार पाडली तातडीची प्रसूती

एमपीसी न्यूज – 25 वर्षीय सीता बेगी या मोती लाल यांच्या पत्नी 9 महिन्यांच्या गर्भवती असताना पतीसोबत रेनिगुंटा एक्स्प्रेसने बेंगळुरुहून अहमदाबाद असा प्रवास करत होत्या. शनिवारी रात्री साधारण 9.15 च्या सुमारास त्यांना प्रचंड प्रसूतीकळा सुरू झाल्याचे रेल्वे कमर्शिअल ऑफिस ए.टी. गंगवानी यांना कळवण्यात आले. त्यांनी या महिलेला तातडीने पुणे स्थानकातील आदित्य बिर्ला मोफत वैद्यकीय केंद्रात रवाना केले. तिथे डॉ. प्रसाद सावंत यांच्या नेतृत्वाखाली बीव्हीजी डॉ. जयश्री अलकुंटे यांनी या वैद्यकीय केंद्रातील आपातकालीन परिस्थिती सांभाळत अगदी यशस्वीरित्या प्रसूती पार पाडली.

“आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी माता आणि नवजात बालकाची संपूर्ण काळजी घेत ते दोघे सुखरूप असल्याची खातरजमा केली. माता आणि बालकाची योग्य तपासणी केली. जन्माच्या वेळी 2.8 किलो वजनाचे हे बाळ अगदी सुखरुप असून जन्मानंतर लगेचच ते रडूही लागले. पुढील देखरेखीसाठी माता आणि तिच्या नवजात मुलाला ससून रुग्णालयात दाखल केल्याचे आदित्य बिर्ला हॉस्पिटलचे डॉ. प्रसाद सावंत यांनी सांगितले.

“अशाप्रकारची आपातकालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पुणे स्थानकात कायम सज्ज असलेल्या आमच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा आम्हाला अभिमान आहे. रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे पोलिसांकडून मिळणारे सहकार्यही वाखाणण्याजोगे आहे. माता आणि तिचे बाळ सुखरूप असल्याचे कळल्याने मला फारच आनंद झाला,” असे आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या सीईओ रेखा दुबे यांनी सांगितले.

“प्रवाशांना चोवीस तास मोफत वैद्यकीय सेवा देता यावी यासाठी एप्रिल 2018 मध्ये मध्य रेल्वेच्या पुणे विभागासोबत आम्ही मोफत वैद्यकीय केंद्र सुरू केले. स्थापना झाल्यापासून या केंद्रात 5304 रुग्णांवर उपचार झाले आहेत, 118 आपातकालीन आणि गंभीर स्थिती हाताळण्यात आल्या आणि चालत्या ट्रेनमधील 320 रुग्णांना सेवा दिली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून मिळणारा पाठिंबा आणि सहकार्य यामुळे आमचे कर्मचारी फारच छान काम करत आहेत,” असे त्या पुढे म्हणाल्या.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3