Pune : कौतुकास्पद ! बकऱ्यांच्या कुर्बानीऐवजी रक्तदान करून बकरी ईद साजरी

रक्तदान करणाऱ्या मुस्लिम बांधवांचे सर्वत्र कौतुक होत आहे. : Admirable! Celebrate Bakri Eid by donating blood instead of sacrificing goats

0

एमपीसी न्यूज : पुण्यातील काही मुस्लीम बांधवांनी जुन्या परंपरेला छेद देत बकऱ्याची कुर्बानी देण्याऐवजी रक्तदान करून बकरी ईदचा सण साजरा केला. रक्तदान करणाऱ्या मुस्लिम बांधवांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पुण्यातील साने गुरुजी स्मारक येथील एका हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला.

संपूर्ण देशभरात बकरी ईद मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या दिवशी बकऱ्याची कुर्बानी देऊन मुस्लिम बांधव हा सण साजरा करतात. तशी परंपरा मुस्लिम समजत आहे.

परंतु, पुण्यातील काही मुस्लीम बांधवांनी या परंपरेला छेद देत बकऱ्याची कुर्बानी देण्याऐवजी रक्तदान करू बकरी ईद साजरी करण्यात आली.

सध्या कोरोनाच्या संकटकाळात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे राज्य शासन, लोकप्रतिनिधी आणि डॉक्टरांकडून रक्तदानाचे आवाहन करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही मुस्लिम बांधवानी यंदा बकऱ्यांची कुर्बानी देण्याऐवजी रक्तदान करण्याचा निर्णय घेतला होता.

मुस्लिम सत्यशोधन मंडळाच्यावतीने या अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like