Pune : धुळवड, रंगपंचमीचा आनंद कुटुंबासोबतच लुटावा – डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले दोन रुग्ण आढळल्याने पुणेकरांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे. धुळवड, रंगपंचमी हे सण सार्वजनिक पद्धतीने साजरे न करता आपल्या कुटुंबासोबत या सणांचा आनंद लुटावा, अशी सूचनाही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे. 

होळी, धुळवड, रंगपंचमी, तुकाराम बीज तसेच गावोगाव भरणाऱ्या यात्रा व उरुसांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दीची ठिकाणे टाळावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी अनोळखी व्यक्ती मोठ्या प्रमाणात असतात. त्यात कोरोना संसर्ग झालेल्या एखाद्या व्यक्तीशी आपला संपर्क आला तर कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका असतो. तसेच गर्दीच्या ठिकाणी संसर्गजन्य रोगांचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. कोरोना विषाणूंचा संसर्ग व प्रसार टाळण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन शासकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

त्यासाठी धुळवड, रंगपंचमी सण आपल्या कुटुंबीयांसोबतच साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

संबंधित बातम्या

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.