Pune : येवले चहामध्ये सिंथेटिक फूड कलरचा वापर केल्याचा एफडीएचा निष्कर्ष

एमपीसी न्यूज- पुण्यातील प्रसिद्ध येवले चहामध्ये भेसळ असल्याचे एफडीएने प्रयोगशाळेमध्ये केलेल्या तपासणीमध्ये सिद्ध झाले आहे. या चहामध्ये सिंथेटिक फूड कलरचा वापर केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा येवले चहा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

_MPC_DIR_MPU_II

केंद्र सरकारच्या एफडीए विभागाच्या प्रयोगशाळेमध्ये ही तपासणी करण्यात आली. यापूर्वी देखील अन्न व औषध प्रशासनाने येवले चहावर कारवाई केली होती. त्यावेळी चहाचे नमुने घेण्यात आले होते. त्याची तपासणी केली असतात पहिल्या अहवालामध्ये कोणतीही भेसळ झालेली नसल्याचे निष्पन्न झाले. मात्र दुसऱ्या अहवालामध्ये या चहामध्ये सिंथेटिक फूड कलरचा वापर करण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे.

या कारवाईमुळे उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.