Pune : कॅन्टोंन्मेंटच्या रुग्णालयात कोरोना रुग्णांची परवड-रमेश अय्यर

Pune: Corona patients suffer from various problems in cantonment hospital - Ramesh Iyer

एमपीसी न्यूज : पुणे कॅन्टोंन्मेंट बार्डाच्या सरदार पटेल रुग्णालयात अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे कोरोनाबाधित रुग्णांचे अपार हाल होत आहेत. या गचाळ कारभारात सुधारणा व्हावी, अशी मागणी पुणे शहर काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस रमेश अय्यर यांनी केली आहे.

सरदार पटेल रुग्णालयात गळके स्वच्छतागृह, ठिकठिकाणी अस्वच्छता आढळून येत आहे. उपचार चालू असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना स्वतःच सगळीकडे स्वच्छता करुन घ्यावी लागत आहे.

पिण्याचे पाणी देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही, हिटरमधून पडणारे गरम पाणी प्लास्टिकच्या बाटलीत घेऊन त्या पाण्याने गुळण्या करण्याची वेळ रुग्णांवर आलेली आहे.

आजारी रुग्णांना स्वतःच खोलीची झाडलोटही करावी लागत आहे. यातून संसर्ग वाढण्याचा धोका उद्भवू शकतो. हा सर्व प्रकार फार संतापजनक आसल्याने रुग्णांचे नातेवाईक चिडले आहेत असे अय्यर यांनी सांगितले.

पुणे कॅन्टोंन्मेंट बार्डाच्या सरदार पटेल रुग्णालयात तातडीने सुधारणा होणे गरजेचे आहे, अशी मागणीही अय्यर यांनी केली.

दरम्यान, या संदर्भात रुग्णालय प्रशासनाची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. ती मिळाल्यास या बातमीत समाविष्ट करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.