Pune: मुल होण्यासाठी विवाहितेकडून करून घेतली अघोरी पूजा, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune: Aghori pooja performed by a married woman to have a child, case filed against 5 persons मूल होत नसल्याच्या कारणावरून या महिलेच्या पती सासू-सासरे यांनी संगनमत करून तिचा शारीरिक छळ केला.

एमपीसी न्यूज- पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मूल होत नाही म्हणून एका विवाहितेकडून अघोरी पूजा करून घेण्यात आली. याप्रकरणी पीडित विवाहितेने छळ आणि अघोरी पूजा करण्यास भाग पाडल्या संबंधी तक्रार दिली असून भिगवण पोलीस ठाण्यात तिच्या पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एक महिला मांत्रिक आणि तिच्या सहकाऱ्याचाही समावेश आहे.

फिर्यादी महिला 21 वर्षांची असून ती घरकाम करते. 2017 ते 2020 दरम्यान हा प्रकार घडला. मूल होत नसल्याच्या कारणावरून या महिलेच्या पती सासू-सासरे यांनी संगनमत करून तिचा शारीरिक छळ केला.

वारंवार शिवीगाळ करून तिला मारहाणही केली. तर इतर दोन महिलांनी आपल्यामध्ये अलौकिक शक्ती असून आमच्या सांगण्यानुसार वागली नाही तर तुला मूळ होणार नाही, अशी भीती घातली. तसेच या विवाहितेच्या केसाच्या दोन बटा ही या महिलांनी उपटून काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.