Pune : कसबा पेठेतील नियोजित मेट्रो स्टेशनच्या निषेधार्थ नागरिकांचे आंदोलन

एमपीसी न्यूज- शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यान मेट्रो धावणार असून त्यासाठी कसबा पेठेतील झांबरे चावडी येथे मेट्रो स्टेशन होणार आहे. या मेट्रो स्टेशनमुळे अनेक नागरिक विस्थापित होणार असल्याने त्याच्या निषेधार्थ फडके हौद चौकात नागरिकांनी मेट्रो स्टेशन निषेधार्थ आंदोलन केले.

यावेळी बोलताना अॅड मोहन मोरे म्हणाले की, शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गादरम्यान बुधवार पेठ चौकात मेट्रो स्टेशन होणार होते. मात्र आता बुधवार चौकाएवजी कसबा पेठेतील झांबरे चावडी फडके हौद परिसरातील 70 गुंठे जागेवर मेट्रो स्टेशन उभारले जाणार आहे. या स्टेशनमुळे 250 कुटुंबांना आणि 30 व्यावसायिकाना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे या भागात मेट्रो स्टेशन होता कामा नये. कसबा भाग सोडून कुठे ही मेट्रो स्टेशन करावे. यासाठी आम्ही आंदोलन केले असून या आंदोलनाची दखल सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाने न घेतल्यास भविष्यात आणखी तीव्र लढा उभारणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.