Pune : रावण दहन कार्यक्रमाच्या विरोधात भीम आर्मी संघटनेचे आंदोलन

एमपीसी न्यूज- रावण दहनाला भीम आर्मी संघटनेने विरोध करत गुरुवारी संध्याकाळी पुण्यात आंदोलन केले . रावण आमच्यासाठी पूजनीय असून रावण दहन करणे गुन्हा असल्याचे सांगत आंदोलनकर्त्यांनी रावण दहनाला विरोध केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकाना ताब्यात घेतले . 20 ते 25 कार्यकर्त्यांनी यावेळी आंदोलनात सहभाग घेतला होता.

अनेक राज्यांमधील आदिवासी समाजात रावणाला दैवत मानले जाते. रावण दहनामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जातील. त्यामुळे पोलिसांनी रावण दहनाच्या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये, रावण दहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी भीम आर्मीच्या वतीने करण्यात आली होती. पोलिसांनी या कार्यक्रमास परवानगी दिली तर संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही संघटनेने दिला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.