BNR-HDR-TOP-Mobile

Pune : एग्रेको एनर्जी कंपनीचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

एमपीसी न्यूज – एग्रेको एनर्जी इंडिया प्रा. ली. या कंपनीने सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला.

सांगली, कोल्हापूर जिल्हा आणि परिसरात आलेल्या पुरामध्ये अनेक संसार वाहून गेले. सर्वत्र पाणीचपाणी अशी स्थिती निर्माण झाली. यावर मात करण्यासाठी राज्याच्या अनेक भागातून मदत मिळाली. प्रत्येकाने आपापल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न केला.

एग्रेको एनर्जी इंडिया प्रा. लि. या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी स्वतः पैसे जमा करून सांगली व कोल्हापूर भागातील पूरग्रस्तांना मदत केली. कंपनीतील १५-२० कर्मचारी पूरग्रस्त भागात जाऊन काही दिवस मुक्कामी राहिले.

पुरग्रस्ताच्या समस्या जाणून घेतल्या. सांगली व कोल्हापूरमधील भुवनेश्वरवाडी, धनगाव या गावात जाऊन कर्मचा-यांनी तेथील ३० ते ४० घरांना रिचार्जेबल बॅटरी दिली. तसेच तेथील काही ठिकाणी स्वछता केली.

.