BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पीएमपीएमएलकडून अनुदानित पास अर्ज वाटप सुरू

एमपीसी न्यूज – शैक्षणिक वर्ष 2019 -2020 साठी पीएमपीने अनुदानित पास वाटप सुरू केले आहे. पुणे महापालिका प्राथमिक, माध्यमिक, इयत्ता पाचवी ते बारावी विद्यार्थी तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील प्राथमिक, माध्यमिक विद्यार्थ्यांना मान्यताप्राप्त खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. यासाठी सोमवार (दि.10) पासून पास अर्जाचे वितरण सुरू करण्यात आले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड हद्दीत सोमवार (दि.10) पासून पास अर्जांचे वितरण सुरूवात झाले आहे. हे अर्ज महामंडळाच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड विभागातील सर्व आगारांमध्ये स्वीकारले जाणार आहेत.

  • दरम्यान, सर्व शाळांच्या प्रतिनिधींनी जर त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्याचे एकत्रित अर्ज आगारास उपलब्ध करुन दिल्यास त्यांना पासेसचे एकत्रित वाटप केले जाईल. शाळाप्रमुखांकडून विद्यार्थ्यांना पासचे वाटप झाल्यास विद्यार्थ्यांना आगारात खेटे घालण्याची गरज पडणार नाही.

खासगी शाळांतील विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची तपासणी झाल्यावर पासची 25 टक्के रक्कम चलनाद्वारे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे बॅंक खाते असलेल्या बॅंक ऑफ बडोदाच्या कोणत्याही शाखेत भरणा केल्यानंतर विद्यार्थ्यांना जवळच्या आगारामध्ये पास मिळणार आहे.

  • तर, पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील विद्यार्थ्यांना बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या कोणत्याही शाखेत भरणा केल्यानंतर पास मिळणार आहे. पासेस वितरण व्यवस्था 17 जूनपासून दोन्ही महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व आगारांमधून सुरु करण्यात येणार आहे.
HB_POST_END_FTR-A2