Pune: जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (बुधवारी) मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद पुन्हा एखदा अजित पवार यांच्याकडे आले आहे. यापूर्वी अजित पवार यांनी 2004 ते 2014 दरम्यान सलग दहा वर्ष पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषविले होते. पाच वर्षानंतर राज्यात सत्ता बदल झाला आहे.

महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत आले आहे. या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. अपेक्षेप्रमाणे अजित पवार यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे.

जिल्हानिहाय पालकमंत्री :

पुणेअजित अनंतराव पवार

2.      मुंबई शहर–  अस्लम रमजान अली शेख

3.      मुंबई उपनगर–  आदित्य उद्धव ठाकरे  

4.    ठाणे– श्री. एकनाथ संभाजी शिंदे

5.     रायगड – श्रीमती आदिती सुनिल तटकरे

6.      रत्नागिरी– ॲड. अनिल दत्तात्रय परब

7.     सिंधुदुर्ग– श्री. उदय रविंद्र सामंत

8.     पालघर– श्री. दादाजी दगडू भुसे

9.      नाशिक– श्री. छगन चंद्रकांत भुजबळ

10.  धुळे– श्री. अब्दुल नबी सत्तार

11.  नंदुरबार– ॲड. के.सी. पाडवी

12.  जळगाव– श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील

13.  अहमदनगर– श्री. हसन मियालाल मुश्रीफ

14.सातारा– श्री. शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील

15. सांगली– श्री. जयंत राजाराम पाटील

16.  सोलापूर– श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील

17. कोल्हापूर– श्री. विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात

18. औरंगाबाद– श्री. सुभाष राजाराम देसाई

19.  जालना– श्री. राजेश अंकुशराव टोपे

20. परभणी– श्री. नवाब मोहम्मद इस्लाम मलिक

21.  हिंगोली– श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड

22. बीड– श्री. धनंजय पंडितराव मुंडे

23. नांदेड– श्री. अशोक शंकरराव चव्हाण

24.     उस्मानाबाद– श्री. शंकरराव यशवंतराव गडाख

25.  लातूर– श्री. अमित विलासराव देशमुख

26. अमरावती– ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)

27.अकोला– श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू

28. वाशिम– श्री. शंभुराज शिवाजीराव देसाई

29. बुलढाणा– डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे

30. यवतमाळ– श्री. संजय दुलीचंद राठोड

31.  नागपूर– डॉ. नितीन काशिनाथ राऊत

32. वर्धा– श्री. सुनिल छत्रपाल केदार

33. भंडारा– श्री. सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील

34.     गोंदिया– श्री. अनिल वसंतराव देशमुख

35. चंद्रपूर– श्री. विजय नामदेवराव वडेट्टीवार

36. गडचिरोली– श्री. एकनाथ संभाजी शिंदे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.