Pune: अजित पवारांनी सकाळीच केली कामाला सुरुवात

Pune: Ajit Pawar started work early morning, corona review meeting started रविवारी दिवसभरातील दिलासादायक बाब म्हणजे 1175 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

एमपीसी न्यूज- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा सकाळीच कामाला सुरुवात केली आहे. पवार यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना निर्मूलन आढावा बैठक सुरू आहे.

या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित आहेत.

पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट अधिक गडद होत आहे. रविवारी दिवसभरात 992 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर रविवारी दिवसभरातील दिलासादायक बाब म्हणजे 1175 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

तर तेरा बाधितांचा मृत्यू झाला आहे. व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र वाढली आहे. सध्य परिस्थितीत एकशे पाच रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयात सुरू असलेल्या या कोरोना निर्मूलन आढावा बैठकीत नेमकी काय चर्चा होणार आणि प्रादुर्भाव कमी होण्यासाठी नव्याने कुठल्या उपाययोजना राबवल्या जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.