Pune : महापुरुषांच्या अपमानावरून अजित पवार यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

एमपीसी न्यूज : दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे स्वातंत्र्यवीर (Pune) सावरकर यांच्या जयंती निमित्त दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. पण या कार्यक्रमावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचा अर्धपुतळा हटविण्यात आला. त्यावरून विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार हे पुणे दौर्‍यावर होते. त्यावेळी त्या घटनेबाबत विचारले असता ते म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच सरकार आल्यापासून राज्यपाल, सरकारमधील मंत्री या सर्वांनी महापुरुषांचा अपमान करण्याच काम केले आहे.

Pimpri : …म्हणून शहरात दोन तास वीजेचे भारनियमन

त्या विरोधात आम्ही सर्वांनी आंदोलन करत सरकारला जाब विचारण्याच काम केले. पण काल दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्यक्रमादरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचा अर्धपुतळा हटविण्यात आला.

ते पुतळे हटविण्याच कोणतेही कारण नव्हते. या अशा घटना घडता (Pune) कामा नये. मला एक प्रश्न पडतोय की, या घटना जाणीवपुर्वक केल्या जात आहेत का? नजर चुकीने घडले का? त्यामुळे मी त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि राज्यातील जनता या घटनेची निश्चित नोंद घेईल. अशा शब्दात अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर त्यांनी टीका केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.