Pune: अजित पवार मंत्रिमंडळात असणार -मुख्यमंत्री; पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद पवार यांच्याकडे देणार

एमपीसी न्यूज – उद्याच्या आपल्या मंत्रिमंडळात अजित पवार सहकारी असतील, असे सांगून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित असल्याचे संकेत दिले. तसेच पवार यांच्याकडेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद जाणार असल्याचे स्पष्ट समजले जात आहे.

मागील अनेक दिवसांपासून अजित पवार हे शिवसेना-राष्ट्रवादी-काँगेस महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी होणार की नाही?, याची उत्सुकता लागली होती. त्यांच्या सोबतच पुणे जिल्ह्यातून आणखी कोणाला मंत्रिपदाची संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.

पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. अजित पवार यांचे कार्यकर्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचा तातडीने मंत्रिमंडळात समावेश व्हावा, यासाठी अनेकांनी मागणी केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.