Pune : चवीची मेजवानी देणारा एसपीज बिर्याणी हाऊसमधील आखाड महोत्सव

एमपीसी न्यूज- ख-या खवय्या तोच ज्याला चांगलंचुंगलं खाण्यासाठी कुठल्याही कारणाची गरज नसते. शाकाहारी व मांसाहारी दोन्ही भोजनाचा जे मनसोक्त आस्वाद घेतात, त्यांना कुठे, काय चांगले मिळते याची बित्तंबातमी असते. आणि ही माहिती इतरांना देऊन त्यांना खाऊ घालण्यासाठी प्रवृत्त करण्यात देखील ख-या खवय्याला आनंद होत असतो. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात अशी अनेक खास ठिकाणे आहेत की जिथे स्पेशल पदार्थ मिळतात. या माध्यमातून पुण्यातील एका खास हॉटेलचा परिचय सध्या करुन देणे आवश्यक आहे. कारण आखाड आणि त्या हॉटेलला भेट देणे हे एक अत्यावश्यक काम आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पुण्यातील पंचवीस वर्षे प्रसिद्ध असलेल्या एसपीज बिर्याणी हाऊसमध्ये सध्या खास आखाड महोत्सव सुरु आहे. तिथे नेहमीच्या खास डिशेसच्या बरोबरीने इतर स्पेशल डिशेस उपलब्ध आहेत.

जवाहर चोरगे यांनी अतिशय कष्टदायक परिस्थितीतून वाट काढत पंचवीस वर्षांपूर्वी एसपीज बिर्याणी हाऊसची स्थापना केली. १९९० साली जवाहर चोरगे यांनी पत्नी रेखा यांच्या साथीने त्यावेळी थोडेसे धाडस मानावे अशा परिस्थितीत हे हॉटेल सुरु केले. त्याकाळी इतर मांसाहारी पदार्थ मिळत असताना त्यांनी खास बिर्याणी हाऊस सुरु केले. मनात हेच होते की तेव्हा सहजगत्या बिर्याणी हा पदार्थ सामान्य माणसाच्या आवाक्यात येईल आणि त्याला कुटुंबासह बिर्याणी खाण्याचा आनंद घेता येईल.

थोड्याच काळात एसपीज बिर्याणी हाऊसने पुणेकरांच्या मनात घर केले. चांगल्या प्रतीचे मटण, चिकन, उत्तम तांदूळ, खास तयार केलेले मसाले यामुळे बिर्याणीचा सुगंध हळूहळू खवय्यांच्या मनात भरु लागला. आपल्याकडे आलेला ग्राहक तृप्त आणि समाधानी होईल याकडे त्यांनी जातीने लक्ष घातले. असं म्हणतात की माणसाच्या मनात शिरण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो. हेच सूत्र मनाशी जपून एसपीज बिर्याणी हाऊसची मागील पंचवीस वर्षे यशस्वी वाटचाल चालू आहे.

यंदा खास आखाड महोत्सवादरम्यान मटण नल्ली की न्याहरी, खास लेग पीस बिर्याणी, मटण चॉप मसाला फ्राय, पाया सूप यासारख्या वेगळ्या डिशेस उपलब्ध आहेत. पाया सूप, स्पेशल मटण चॉप आणि मटण मसाला फ्राय असे कॉम्बिनेशन येथे उपलब्ध आहे. याशिवाय स्पेशल लेग पीस बिर्याणी यंदा खवय्यांच्या दिमतीला आहे, त्याची चव घेऊन पाहायलाच हवी. तसेच मटण नल्ली की न्याहरीवर पण ताव मारलाच पाहिजे. येत्या एक ऑगस्टपर्यंत एसपीज बिर्याणी हाऊसमध्ये आखाड महोत्सव सुरु आहे. त्यामुळे ग्राहकांची आवडनिवड ओळखून त्यांच्या पोटात चवीचवीनी शिरणा-या एसपीज बिर्याणी हाऊसमधील आखाड महोत्सवाला अवश्य भेट द्या आणि आपल्या आखाड मनसोक्त खाऊन सत्कारणी लावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like