Pune News : पुण्याचा अक्षत ज्युनियर राष्ट्रीय विजेता

एमपीसी न्यूज : पुण्याच्या 12 वर्षीय अक्षत हुपळे (Pune News) याने राष्ट्रीय सुपरक्रॉस मालिकेत ज्यूनियर गटाचे विजेतेपद मिळविले. तो बालेवाडी येथील पीआयसीटी मॉडेल स्कूलमध्ये सातवीत शिकतो.

फेडरेशन ऑफ मोटरस्पोर्टस क्लब ऑफ इंडिया (एफएमएससीआय) या राष्ट्रीय शिखर संघटनेच्या पुढाकारामुळे अक्षतला ही कामगिरी करता आली. काही वर्षांपूर्वी क्लास 8 ज्यूनीयर एसएक्स2 हा गट सुरु करण्यात आला. 8 ते 12 वयोगटातील स्पर्धकांना राष्ट्रीय पातळीवर संधी मिळावी हा यामागील उद्देश होता. या पातळीवर सर्वोत्तम रायडर्स सहभागी होतात. आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी रायडर्स घडवावेत या उद्देशाने वाव देण्यासाठी हा गट सुरु करण्यात आला.

2022 च्या मोसमात सहा फेऱ्या झाल्या. नाशिक, पुणे, बडोदा, कोइमतूर गोवा, बंगळूर या शहरांत या फेऱ्या पार पडल्या. अक्षत साताऱ्याजवळील वाई येथे शनिवारी-रविवारी सराव करतो.(Pune News) रशियाचे ट्रेनर जॉर्जी गुसेव आणि व्हिताली गुसेव तसेच अमेरिकेचा डस्टीन फॅरेस यांच्यासह भारताचा डकार रॅलीतील सहभागी स्पर्धक आशिष रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने प्रशिक्षण घेतले आहे.

Chinchwad News : विविध उपक्रमांनी प्रतिभा महाविद्यालयात संविधान दिन साजरा

सहाव्या फेरीअखेर अक्षतचे एकूण गुण 225 इतके झाले. त्याने नजीकचा प्रतिस्पर्धी सी. भैरव याच्यावर 42 गुणांची आघाडी घेतली. आठही गटांत ही आघाडी सर्वाधिक होती.

मोसमातील या वाटचालीबाबत अक्षत म्हणाला की, गोव्याची फेरी सर्वाधिक आव्हानात्मक होती. त्यावेळी मला ताप आला होता आणि घशालाही संसर्ग होता. मालिकेत आघाडी घेणे हेच माझे लक्ष्य होते. अखेरच्या फेरीपूर्वी जेतेपद जवळपास नक्की करणे विलक्षण समाधान देणारे होते. मला 12 वर्षांखालील गटात मालिका जिंकून आघाडी भक्कम करायची होती. ते मोठ्या शैलीत आणि धडाक्यात करू शकलो याचा आनंद वाटतो. माझ्या कामगिरीत सातत्य निर्णायक राहिले. यंदाच्या मोसमात सर्व सहा फेऱ्या सर्वाधिक गुणांनी जिंकलेला मीच एकमेव स्पर्धक होतो.

आगामी काळात आशियाई आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सहभागी होण्याचे त्याचे ध्येय आहे.बंगळूरला गेल्या रविवारी पार पडलेल्या अखेरच्या फेरीत अक्षतचे जेतेपद साकार झाले आणि गुरुवारी पुण्यात अक्षतला एमएफएससीआयच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते खास सत्कार करण्यात आला.

फ्रँचायजींच्या संघांचा सहभाग असलेल्या भारतामधील पहिल्यावहिल्या सुपरक्रॉस लीगच्या घोषणेनिमित्त आयोजित कार्यक्रमात अक्षतला सन्मानित करण्यात आले.

सविस्तर निकाल (सहाव्या फेरीअखेर, पहिले तीन क्रमांक)

क्लास 1 : ऋग्वेद बारगुजे (टीव्हीएस आरटीआर 300 एफएक्स, टीम टीव्हीएस पेट्रोनास) 212 गुण, सी. डी. जीनन (टीव्हीएस आरटीआर 300 एफएक्स, टीव्हीएस पेट्रोनास) 199, व्ही. प्रज्वल (टीव्हीएस आरटीआर 300 एफएक्स, टीव्हीएस पेट्रोनास) 171

क्लास 2 : जितेंद्र संगवे (कावासाकी केएक्स 250 एफ, इचलकरंजी) 182, श्लोक घोरपडे (केटीएम 150 एसएक्स, सातारा) 154, के. मणीकंदन (कावासाकी केएक्स 250 एफ, कोइमतूर) 142

क्लास 3 : जीर्वा बँटैलंग (टीव्हीएस आरटीआर 200, टीव्हीएस पेट्रोनास) 107, डी. सचिन (टीव्हीएस आरटीआर 200, टीव्हीेस) 94, टी. अरुण (टीव्हीएस आरटीआर 200, टीव्हीएस पेट्रोनास) 90

क्लास 5 : इम्रान पाशा (टीव्हीएस आरटीआर 200 टीव्हीएस पेट्रोनास) 92, डी. सचिन (टीव्हीएस आरटीआर 200, टीव्हीएस पेट्रोनास) 90, आर. नटराज (टीव्हीएस आरटीआर 200, टीव्हीएस पेट्रोनास) 81

क्लास 6 : टी. अर्जुन (हिरो इम्पल्स, हसन) 117, करणकुमार (हिरो इम्पल्स, बंगळूर) 75, पी. योगेश (हिरो इम्पल्स, कोइमतूर) 54

क्लास 7 : श्लोक घोरपडे (केटीएम 150 एसएक्स, सातारा) 223, जितेंद्र संगवे (कावासाकी केएक्स 250 एफ, इचलकरंजी) 194, अनस्त्य पोळ (कावासाकी केएक्स 100, बंगळूर) 152

क्लास 8 : अक्षत हुपळे (केटीएम एसएक्स 85, पुणे) 225, सी. भैरव (केटीएम एसएक्स 65, बंगळूर) 183, जे. सुजन (केटीएम एसएक्स 85, कोइमतूर) 157

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.