Pune : अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धेत पी. के. वैष्णव, मिरा सिंग, समशेर सिंग, समरेश जंग, किर्ती के सुसीलन यांना सुवर्ण पदक 

सांघिक गटात सीआयएस, सीआरपी, आयटीबीपी, सीआरपीएफ संघांना सुवर्ण

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र पोलीस यांच्या वतीने तेराव्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी (क्रीडा) स्पर्धेत पी. के. वैष्णव, समशेर सिंग, मिरा सिंग, समरेश जंग व  किर्ती के सुसीलन यांनी आपापल्या गटात अव्वल कामगिरी करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. सांघिक गटात  सीआरपी संघाने महिलांच्या 300 मीटर बीग बोर फ्री रायफल प्रोन, पुरूषांच्या 50 मीटर फ्री रायफल प्रोन व  महिलाच्या 10 मीटर एअर रायफल या तिन्ही प्रकारात अव्वल स्थान राखत तिहेरी सुवर्णपदक पटकावले.

वडाचीवाडी फयरींग रेंज, उंद्री येथे सुरू असलेल्या स्पर्धेत पुरूषांच्या 300 मीटर बीग बोर रायफल प्रकारात  सीआयएसच्या पी. के. वैष्णवने सर्वाधीक  587.0 गुण मिळवत सुवर्ण पदक पटकावले. राजस्थानच्या विरेंद्र चौधरीने 585.0 गुणासह रौप्य, तर आयटीबीपीच्या विरेंद्र  प्रकाश याने 581 गुणांसह कांस्य पदक पटकावले.

पुरूषांच्या सांघिक गटात 300 मीटर बीग बोर रायफल प्रकारात सीआयएसएफ संघाने 1729.0 गुणासह सुवर्ण पदक पटकावले. यात पी. के. वैष्णवने वैयक्तीक गटाप्रमाणे सांघीक गटातही 587.0 गुण मिळवत संघाला सुवर्ण पदक मिळवून दिले. सुधिर कुमारने 576.0 तर भिमसिंग रावतने 566.0 गुण मिळवले. राजस्थान संघाने1716.0 गुणांसह रौप्य व  सीआरपीएफ संघाने 1710.0 गुणांसह कांस्य पदक पटकावले.

महिलांच्या  300 मीटर बीग बोर रायफल प्रकारात सीआरपीएफच्या मिरा सिंगने 577 गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले. तेलंगणाच्या व सी एच माधवीने 575 गुणांसह रौप्यपदक तर तेलंगणाच्या किनारा शर्मा हिने 573 गुण मिळवत कास्यपदक पटकावले. महिलांच्या सांघिक गटात सीआरपी संघाने 1714.0 गुणांसह सुवर्णपदक पटकावले. यात मिरा सिंगने 577.0, कुमारी शर्माने 573.0 व मनशा मांडवी 564.0 गुण मिळवले. तेलंगणा संघाने 1705.0 गुणांसह रौप्य व बीएसएफ संघाने 1672.0 गुणासह कांस्य पदक पटकावले.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरूषांच्या 50 मीटर फ्री रायफल प्रोन प्रकारात बीएसएफच्या समशेर सिंगने618.3 गुणांसह सुवर्ण तर सीआरपीच्या मलिक खानने 616.9 गुणांसह रौप्य व रामस्वरूपने 616.0 गुणांसह कांस्य पदक पटकालव. सांघिक गटात सीआरपी संघाने 1848.2 गुणासह सुवर्ण पदकाची कमाई केली. यात मलिक खानने 616.9, रामस्वरूपने 616.0 व साफी मोहम्मदने 615.3 गुण मिळवले. सीआयएस संघाने 1834.3 गुणांसह रौप्य व बीएसएफ संघाने 1831.8 गुणासह कांस्य पदक पटकावले.

पुरूषांच्या 25 मीटर एसटीडी  पिस्टल प्रकारात सीआयएसएफच्या समरेश जंगने 562.0गुणांसह सुवर्ण पदकाची कामाई केली. आयटीबीपीच्या प्रदिप सिंग शेखावतने 557.0 गुणासह रौप्य तर  मानवेंद्र चौधरीने 556.0 गुणासह कांस्य पदक पटकावले. सांघिक गटाक आयटीबीपी संघाने 1665.0 गणांसह सुवर्ण पदक पटटकावले. यात प्रदिप सिंग शेखावतने 557.0, 3. मानवेंद्र चौधरीने 556.0 व मनिष राणाने 552.0 गुण मिळवले. पंजाब संघाने 1634.0 गुणासह रैप्य व सीआरपी संघाने 1631.0 गुणासह कांस्य पदकाची कमाई केली.

महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात केरळच्या किर्ती के सुसीलन हीने 626.4 गुणांसह सुवर्ण पदकाची कमाई केली. पंजाबच्या अंजूम मोदगीलने 623.6 गुणांसह रौप्य तर सीआरपीच्या पुनम देवीने 618.7 गुण मिळवत कांस्य पदक पटकावले. सांघिक गटात सीआरपी संघाने 1846.3 गुणांसह सुवर्ण पदक पटकावले. यात पुनम देवीने 618.7, कुमारी किर्तीने 618.5 व अंजू कुमारीने 609.1 गुण मिळवले.  बीएसएफ संघाने 1839.1 गुणांसह रौप्य व  पंजाब संघाने 1836.5 गुण मिळवत कांस्य पदक पटकावले.

  • स्पर्धेचा सविस्तर निकाल-

300 मीटर बीग बोर फ्री रायफल प्रोन (पुरुष)
प्रथम – पी. के. वैष्णव (सीआयएस) (587.0)
द्वितीय – विरेंद्र चौधरी(राजस्थान) (585.0)
तृतीय – विरेंद्र प्रकाश(आयटीबी) (581.0)

सांघिक गट – 300 मीटर बीग बोर रायफल (पुरुष)
प्रथम – सीआयएसएफ – 1729.0 (पी. के. वैष्णव 587.0, सुधिर कुमार 576.0, भिमसिंग रावत 566.0)
द्वितीय – राजस्थान-1716.0 (विरेंद्र चौधरी 585.0, शिवराज  572.0, राकेश 559.0)
तृतीय – सीआरपीएफ- 1710.0 (साफी मोहम्मद 579.0, परवीन 569.0, शौलेश कुमार सिंग 562.0)

300 मीटर बीग बोर फ्री रायफल प्रोन (महिला)
प्रथम – मिरा सिंग (सीआरपीएफ) (577)
द्वितीय – सी एच माधवी (तेलंगणा) (575)
तृतीय – कुमारी शर्मा (तेलंगणा) (573)

सांघिक – 300 मीटर बीग बोर फ्री रायफल प्रोन (महिला)
प्रथम – सीआरपी – 1714.0 (मिरा सिंग 577.0, कुमारी शर्मा 573.0, मनशा मांडवी 564.0)
द्वितीय – तेलंगणा – 1705.0 (व्हि. सुवर्णा 575.0, सी.एच माधवी 573.0, एम.विजयाम्मा 557.0)
तृतीय – बीएसएफ – 1672.0 (मनप्रीत कौर 570.0, नितू उज्जवल 560.0, संदिप कौर 542.0)

50 मीटर फ्री रायफल प्रोन (पुरुष)
प्रथम – समशेर सिंग (बीएसएफ) (618.3)
द्वितीय – मलिक खान (सीआरपी) (616.9)
तृतीय – रामस्वरूप(सीआरपी)(616.0)

सांघिक गट – 50 मीटर फ्री रायफल प्रोन (पुरुष)
प्रथम – सीआरपी 1848.2 (मलिक खान 616.9, रामस्वरूप 616.0, साफी मोहम्मद 615.3)
द्वितीय – सीआयएस 1834.3:(नवदीप सिंग राठोरे 614.6, पी.के वैष्णव 613.1, एकंबीर सिंग मंडी 606.3)
तृतीय – बीएसएफ: 1831.8(समशेर सिंग 618.3, विमलेश राठोर 607.2, प्रजापती कुमार 606.3)

25 मीटर एसटीडी पिस्टल  (पुरुष)
प्रथम – समरेश जंग (सीआयएसएफ) (562.0)
द्वितीय – प्रदिप सिंग शेखावत (आयटीबीपी) (557.0)
तृतीय – मानवेंद्र चौधरी(आयटीबीपी)(556.0)

सांघिक – 25 मीटर एसटीडी  पिस्टल (पुरुष)
प्रथम – आयटीबीपी 1665.0 (प्रदिप सिंग शेखावत 557.0, मानवेंद्र चौधरी 556.0, मनिष राणा 552.0)
द्वितीय – पंजाब 1634.0: (बलजीत सिंग 543.0, अक्षय जैन  540.0, अजितेश कौशल 551.0)
तृतीय – सीआरपी 1631.0 :(अंतरीक दत्ता 551.0, सुरेश माळी 541.0, लहु गायकवाड 539.0)

10 मीटर एअर रायफल (महिला)
प्रथम – किर्ती के सुसीलन (केरळ) (626.4)
द्वितीय – अंजूम मोदगील (पंजाब) (623.6)
तृतीय – पुनम देवी (सीआरपी) (618.7)

सांघिक – 10 मीटर एअर रायफल (महिला)
प्रथम – सीआरपी 1846.3 (पुनम देवी 618.7, कुमारी किर्ती 618.5, अंजू कुमारी 609.1)
द्वितीय – बीएसएफ 1839.1 (गाडलींग कोमल 614.1, प्रिया सुरण 613.4, रूबीना 611.6)
तृतीय – पंजाब 1836.5 (अंजूम मोदगील 623.6, रजनी 607.6, गुरमीत कौर 605.3)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.