Pune : जेजुरीसह महाराष्ट्रातील सर्व देवस्थाने सनदधारक गुरव पुजाऱ्यांच्या ताब्यात द्या

 राष्ट्रीय गुरव समाज महासंघाची मागणी

एमपीसी न्यूज- श्री खंडेराया देवस्थान जेजुरी (Pune )मंदिराच्या विश्वस्त समितीवर नेमणुकांवरून वाद निर्माण झाला आहे.अशा नेमणुकांमध्ये राज्य शासनाने किंवा कुठल्याच राजकीय पक्षाने हस्तक्षेप करू नये. राज्यातील बहुतांश मंदिरांमध्ये शेकडो वर्षापासून पूजाअर्चा करण्याचा आणि मंदिर व्यवस्थापन करण्याचा हक्क सनदधारक सेवाधारी गुरव समाजाचा आहे.मंदिराचे व्यवस्थापन करणे हे राजकीय पक्षाचे किंवा व्यक्तींचे काम नसून अशी सर्व मंदिरे शेकडो वर्षापासून मंदिर व्यवस्थापनात तज्ञ असणाऱ्या गुरव पुजाऱ्यांच्या ताब्यात द्यावीत, अशी आग्रहाची मागणी राष्ट्रीय गुरव समाज महासंघाने केली.

अन्यथा समस्त गुरव समाज तीव्र आंदोलन करण्याचा इशारा असा इशारा राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे अध्यक्ष विजयराज शिंदे यांनी दिला आहे. संघटक डॉ नितीन ढेपे, प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर पत्रकार परिषदे करीता उपस्थित होते.

यावेळी विजयराज शिंदे म्हणाले की,जेजुरी मंदिर येथील पूजाअर्चेचे अधिकार शेकडो वर्षापासून गुरव समाजाकडे आहेत. तशा आशयाच्या  छत्रपतींच्या काळापासूनच्या सनदा आणि राजमाता जिजाऊंच्या वतीने केलेल्या निवाड्याचा ताम्रपट गुरव समाजाच्या नावाने आहे.

Pimpri : अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

तरीसुद्धा मागील 25 ते 30 वर्षांमध्ये जेजुरी मंदिर ट्रस्टमध्ये गुरव समाजाचा समावेश नाही. सध्या चालू असलेला वाद हा स्थानिक विरुद्ध बाहेरचे असा आहे. मंदिर समितीवर स्थानिक लोकांची नेमणूक नक्कीच व्हावी, पण ती गुरव समाजातूनच व्हावी आणि किमान पन्नास टक्के विश्वस्त हे सनदधारी गुरव समाजातून निवडले जावेत,अशी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

  तसेच ते पुढे म्हणाले की,मंदिराच्या व्यवस्थापनामध्ये शासनाने राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करू नये. मंदिर कसे चालवावे त्याचे व्यवस्थापन कसे करावे याचा कित्येक पिढ्यांचा अनुभव असलेल्या गुरव समाजाच्या ताब्यात ही मंदिरे द्यावीत. ज्या ठिकाणी गुरव पुजाऱ्यांना सनदा आणि ताम्रपट मिळालेले आहेत. तेथील ट्रस्टमध्ये गुरव पुजाऱ्यांचे प्रतिनिधित्व शंभर टक्के असावे.

ज्या ट्रस्ट आणि समित्यांमध्ये सरकारचा समावेश आहे किंवा हस्तक्षेप आहे अशा सर्व ठिकाणी मंदिर व्यवस्थापन तज्ञ म्हणून किमान 50 टक्के जागा या सनदधारी गुरव पुजाऱ्यांसाठी राखीव असाव्यात. त्यामुळे जेजुरी शिर्डी, सिद्धी विनायक या सर्व ट्रस्टसह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती वर गुरव पुजाऱ्यांचे प्रतिनिधित्व किमान 50 टक्के असावे अशी राष्ट्रीय गुरव समाज महासंघाची आग्रही मागणी आहे. या मागण्या मान्य ना झाल्यास संपूर्ण गुरव पुजारी समाज रस्त्यावर उतरेल ,असा इशारा देखील यावेळी देण्यात (Pune )आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.