Pune : ‘कोरोना’मुळे मृत्यू झालेले तीनही नागरिक स्थानिक; यातील कोणाचाही नव्हता विदेश प्रवास

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’मुळे (मंगळवारी) आज मृत्यू झालेले तीनही नागरिक स्थानिक होते. त्यांनी विदेशात प्रवास केला नव्हता, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच नागरिकांना करण्यात येत असलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. यावरून ‘कोरोना’ विष्णूने आता पुढील स्टेज गाठली आहे, असे समजत आहे.

(मंगळवारी) आज सकाळी 9 ते 11 दरम्यान ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे तीन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक बाब आहे. ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. आता मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या आठ झाली आहे. तर, 150 च्या आसपास कोरोना’बाधित रुग्ण आहेत.

पुण्यात ‘कोरोना’चे रुग्ण वाढत असल्याने जवळपास 6 किलोमीटरचा परिसर पुणे महापालिकेने सील केला. मार्केटयार्ड ते पुणे स्टेशन परिसरात ही कारवाई करण्यात आली. शहरातील प्रमुख पेठांचाही यामध्ये समावेश आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुण्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने आणखी लॉकडाऊन वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी (दि. 5 एप्रिल) 24 तासांत 3 जणांचा मृत्यू झाला होता. आजही तीन जणांचा मृत्यू झाल्याने पुणेकरांमध्ये कोरोनाबाबत घाबरहाट निर्माण झाली आहे.

आज कोरोनामुळे ज्या तीन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, त्यातील एक पर्वती दर्शन (वय 67), दुसरा भवानी पेठ (65) तर, तिसरा व्यक्ती ताडीवाला रोड (वय 65) भागात वास्तव्यास होता. शहराच्या मध्यवर्ती भागातील या नागरिकांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोरोना विषाणू आता दाटीवाटीने राहत असलेल्या झोपडपट्टीत घुसल्याने खळबळ उडाली आहे.

  • पुण्यातील मृत्यू झालेल्या तीन रुग्णांची माहिती
    पुण्यातील कोरोना पॉझीटीव्ह 67 वर्षाच्या रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. या रुग्णाला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता तसेच दोन्ही फुफ्फुसांचा न्युमोनिया झाला होता. या रुग्णाला 1 एप्रिल 2020 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची कोविड-19 चाचणी पॉझीटीव्ह झाली होती.
  • येथील कोरोना पॉझीटीव्ह 65 वर्षाच्या रुग्णाचा आज सकाळी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या रुग्णाला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता तसेच न्युमोनिया झाला होता. या रुग्णाला 4 एप्रिल 2020 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
  • पुण्यातील कोरोना पॉझीटीव्ह  67 वर्षाच्या रुग्णाचा आज सकाळी 11.30 वाजता मृत्यु झाला आहे. या रुग्णाला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा  त्रास होता तसेच न्युमोनिया व किडणी निकामी झाली होती.  तसेच  या रुग्णाच्या मेंदुला सूज आली होती, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.