Pune: ‘सीएसआर’च्या माध्यमातून मिळालेल्या मदतीचीही अहवालात माहिती द्या -पृथ्वीराज सुतार

एमपीसी न्यूज – मागील साडेचार महिन्यांच्या काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किती खर्च झाला, याचा सविस्तर अहवाल सर्व नागरसेवकांना घरपोच देण्याचे आदेश गुरुवारी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सर्वसाधारण सभेत दिले. या अहवालात ‘सीएसआर’ च्या माध्यमातून मिळालेल्या मदतीचीही माहिती द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. 

पुणे महापालिका प्रशासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील 5 महिन्यांत किती खर्च केला, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 67 (3) (क) नुसार किती खर्च झाला, या सर्व बाबींची संक्षिप्त माहिती अहवालाच्या स्वरूपात द्यावी, असे मुख्य सभा आणि गटनेत्यांच्या बैठकीत ठरले आहे.

हा अहवाल तयार करीत असताना ‘सीएसआर’ च्या माध्यमातून महापालिकेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणकोणत्या कंपन्यांनी, संस्थांनी मदत केली, त्यांची नावे, मदत कशा प्रकारे झाली, त्याचा कोणकोणत्या ठिकाणी खर्च झाला, याची सविस्तर माहिती या अहवालात देण्याची मागणी पृथ्वीराज सुतार यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.