Pune : अमनोरा कप बॅडमिंटन स्पर्धा ; प्रतीक, हर्ष, लौकिक, वर्धन उपांत्यपूर्व फेरीत

एमपीसी न्यूज- प्रतीक धर्माधिकारी, लौकिक ताथेड, हर्ष कातेंगे, अनिश कामथ, वर्धन डोंगरे यांनी पीवायसी हिंदू जिमखाना आणि हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशन आयोजित अमनोरा कप बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून 17 वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

पीवायसीच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील 17 वर्षांखालील मुलांच्या एकेरीतील चौथ्या फेरीत प्रतीक धर्माधिकारीने अग्रमानांकित प्रथम वाणीला 15-14, 15-11 असा पराभवाचा धक्का दिला. यानंतर लौकिक ताथेडने आदित्य लोगानाथनचे आव्हान 15-7, 14-15, 15-10 असे परतवून लावले. निर्बन पालने पीयूष दारजीवर 15-6, 15-12 असा, हर्ष कातेंगेने सुजल तापडियावर 13-15, 15-11, 15-10 असा, तर अनिश कामथने विवेक हब्बूवर 15-8, 15-9 असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. वर्धन डोेंगरेने अथर्व खिस्तीवर १५-७, १५-११ अशी, आर्यन शेट्टीने अनय चौधरीवर 15-9, 15-8 अशी मात करून आगेकूच केली.

निकाल – पुरुष एकेरी : तिसरी फेरी – वसीम शेख वि. वि. सौमित्र पंडित 15-7, 15-4; आशिष पंडित वि. वि. अपूर्व जावडेकर 15-11, 13-15, 15-11; रोहन पटवर्धन वि. वि. विनायक सकपाळ 15-4, 15-7; दर्शन पुजारी वि. वि. नरेंद्र पाटील 10-15, 15-14, 15-10; मोक्षित पोरवाल वि. वि. स्वप्नील ओक 15-10, 15-8; सोहम नावंदर वि. वि. आकाश भालेकर 15-8, 15-9; रोहन स्वरगे वि. वि. नवीनकुमार 15-13, 15-4; योगेश गुंजाळ वि. वि. शैलेश भावे 15-12, 15-12; मिहीर पलांडे वि. वि. गुरुप्रसाद राऊत 15-11, 15-7; अभिषेक बोराटे वि. वि. ऋतुराज नाईक 15-6, 15-14; अनिरुद्ध मयेकर वि. वि.शिव बुते 15-12, 15-10; जयराज शकतावत वि. वि. नीलाब्जो पाल 15-8, 15-13; सलमान अन्सारी वि. वि. राजू ओव्हळ 15-5, 15-8; आर्यन शेट्टी वि. वि. अमेय माळुंजकर 15-9, 15-10; विनीत कांबळे वि. वि. अर्णव लुणावत 15-6, 11-15, 15-9; निमिश कुलकर्णी वि. वि. यश गिरे 15-9, 15-11.

13 वर्षांखालील मुली : तिसरी फेरी – अनन्या अगरवाल वि. वि. अदिती अगरवाल 15-1, 15-3; युतिका चव्हाण वि. वि. प्रणिता कलापुरे 15-9, 15-8; दिव्यांश वहाळ वि. वि. निधी चितळे 15-3, 11-15, 15-12; वसुधा यादव वि. वि. राधा फाटक 15-10, 15-3; अनन्या मिरकुटे वि. वि. पूर्वा पाबळे 15-14, 15-14; तन्वी गुप्ते वि. वि. काव्या शर्मा 15-9, 15-7; अनाहिता शर्मा वि. वि. अद्विका कामत 15-12, 15-8; ज्ञानेश्वरी वायाळ वि. वि. अनन्या जोशी 15-6, 15-8; एकिशा मेदाने वि. वि. यश्वी पटेल 15-9, 15-10; स्वामिनी तिकोने वि. वि. सान्वी डाखने 15-4, 15-5.

13 वर्षांखालील मुले : पाचवी फेरी – यशराज कदम वि. वि. तनिष्क अडे 15-4, 15-4; अर्जुन भगत वि. वि. सार्थक पाटणकर 15-13, 8-15, 15-9; समर्थ साठे वि. वि. विराज तळेगावकर 15-11, 15-12; बिनिश सूद वि. वि. सोहम ढमे 15-10, 15-9; सिद्धान्त कोल्हाडे वि. वि. निक्षेप कात्रे वि. वि. 15-8, 15-5; अजिंक्य कुलकर्णी वि. वि. यशवंत साळोखे 15-14, 15-13.

17 वर्षांखालील मुले : तिसरी फेरी – प्रतीक धर्माधिकारी वि. वि. तनिष काकडे १५-१, १५-९; लौकिक ताथेड वि. वि. आदित्य जोगळेकर 15-11, 15-6; आदित्य लोगानाथन वि. वि. तेज बलखोडे 15-6, 15-6; निर्बन पाल वि. वि.शिरिष पूजारी 15-2, 15-8; पीयूष दारजी वि. वि. अर्णव बडवे 15-6, 15-6; सुजल तापडिया वि. वि. अथर्व ढोरे 15-6, 15-1; हर्ष कातेंगे वि. वि. अरिजित गुंड 15-13, 15-13; विवेक हब्बू वि. वि. हर्ष गायकवाड 15-7, 15-8; अनिश कामथ वि. वि. सर्वेश हाऊजी 15-7, 15-12.

17 वर्षांखालील मुली : तिसरी फेरी – नेहल प्रभुणे वि. वि. सानवी राणे 15-7, 15-14; ज्ञानेश्वरी फळके वि. वि. दीप्ती भागवतुला 15-10, 15-11; रेवती श्रीखंडे वि. वि. श्रेया भोसले 12-15, 15-10, 15-13; श्रेया शेलार वि. वि. गुणिका देशमुख 15-6, 15-11.

11 वर्षांखालील मुले : चौथी फेरी – साचेत त्रिपाठी वि. वि. कृष्णनील गोरे 15-9, 15-14; केविन पटेल वि. वि. ओजस जोशी 15-12, 15-13; अवधूत कदम वि. वि. प्रथमेश वठारे 15-7, 15-4; ओम दरेकर वि. वि. समीहान देशपांडे 15-5, 13-15, 15-12; आदर्श राऊत वि. वि. राघवेंद्र यादव 15-11, 15-4; नील जोशी वि. वि. सोहम ढमे 15-11, 15-12.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.