Pune : सासवड नगरीत 19 जानेवारीला आंबेडकरी विचार, साहित्याचा जागर; संमेलनाध्यक्षपदी ‘उचल्याकार’ लक्ष्मण गायकवाड यांची निवड

एमपीसी न्यूज – डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार साहित्य आणि दलित साहित्याला नवी दिशा देणारे तिसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य आणि विचार संमेलन दि. 19 जानेवारी रोजी सासवड नगरीत पार पडणार आहे. आचार्य अत्रे सभागृहात हे संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी विद्रोही साहित्यिक ‘उचल्याकार’ लक्ष्मण गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.

या संमेलनाचे उदघाटन सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाचे आयोजन सिद्धार्थ सामाजिक विकास प्रतिष्ठान हरगुडे व समविचार संस्था संघटनेतर्फे करण्यात आले आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी जिल्हाधिकारी संभाजी झेंडे आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून माजी न्यायमूर्ती बी. जे. कोळसे पाटील, डॉ. शशी रॉय आहेत.

उदघाटन सत्रात काही निवडक लोकांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पुरस्कार देण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सेवा सन्मान पुरस्कार राज्यमंत्री बच्चू कडू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता सन्मान टीव्ही – 9 चे पत्रकार योगेश बोरसे यांना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट कला व सन्मान ‘कॉपी’ सिनेमा दिग्दर्शक दयासागर वानखेडे यांना देण्यात येणार आहे. या सत्रात आमदार संजय जगताप व पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांचाही सन्मान करण्यात येणार आहे, असे संयोजन कमिटीचे अध्यक्ष पंकज धिवार यांनी सोमवारी दुपारी पत्रकार परिषदेत सांगितले.

प्रथम सत्रात फुले – शाहू – आंबेडकर यांचा महिला सक्षमिकरणाविषयीचा दृष्टीकोण आशा आशयाचा परिसंवाद ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये अध्यक्षस्थानी दैनिक पुण्यनगरीच्या संपादिका राही भिडे आहेत. डॉ. मनीषा गुप्ते, डॉ. निशा भंडारे, डॉ. नूतन माळवी सहभागी होणार आहेत.

दुपारच्या सत्रात शाहीर सागर गोरखे व संच यांचा प्रबोधनपर गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. समारोपामध्ये जेष्ठ साहित्यिक विचारवंत उत्तम कांबळे हे या संमेलनाचा समारोप करणार आहेत. राजेश चव्हाण, स्वप्नील घोडके, दादा गायकवाड, रवी वाघमारे, नितेश पवार, स्वप्नील कांबळे संस्थेचे संयोजन समितीचे सदस्य आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like