Pune : महाराष्ट्रातून मला 45 जागा निवडून द्या- अमित शहा

एमपीसी न्यूज- देशात झालेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राची जनता भाजपच्या मागे खंबीरपणे उभा राहिली. त्याप्रमाणे आता आगामी निवडणुकीत भाजप सोबत राहून 45 जागा निवडून द्या असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले.

पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे अमित शहा यांनी पुणे, शिरुर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शक्ति केंद्र प्रमुखांना, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

अमित शहा म्हणाले, ” देशभरात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडी केली जात आहे. त्याकडे पाहून हे कसले गठबंधन, हे तर सगळे राज्यातले नेते आहे. जर महाराष्ट्रात ममतांची सभा कोल्हापूरला लावली. अखिलेशला धुळ्यात बोलावले. तर कोणीऐकायला जाणार आहे का?” अशा शब्दात शहा यांनी महाआघाडी मधील नेत्यावर सडकून टीका केली.

शहा पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत विरोधक सत्तेवर आल्यास आपण कित्येक वर्ष मागे जाऊ आणि हे काँग्रेसवाले जातीधर्मात तेढ निर्माण करण्याचे काम करतील. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने भाजपला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. ज्या महाआघाडीचे नेतृत्व शरद पवार करीत आहेत ते या राज्यातील असून त्यांचे 15 वर्ष सरकार महाराष्ट्रात होते. या सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. पण आमच्या सरकारने पारदर्शक कारभार करीत भ्रष्टाचार नष्ट केला”

“अयोध्येत राम मंदिर बनवणार असून भाजपा त्यासाठी कटिबद्ध, वचनबद्ध आहे. पण या प्रश्नावर शरद पवार आणि काँग्रेसचे अशोक चव्हाण यानी मंदिराबाबत भूमिका स्पष्ट करावी” असे शहा म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.