Pune: सक्तीच्या निवृत्तीचा आढळरावांनी आनंद घ्यावा – डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज – शिरुरचे माजी खासदार पराभवाच्या नैराश्यापोटी बोलत आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघ सोडून त्यांनी कोणी विचारत नाही. जनतेने दिलेल्या सक्तीच्या निवृत्तीचा त्यांनी आनंद घ्यावा, असा पलटवार राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे. शिवस्वराज यात्रा संपल्यानंतर राष्ट्रवादी संपेल असे शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी म्हटले होते. त्याला खासदार डॉ. कोल्हे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

डॉ. कोल्हे म्हणाले, “महाजनादेश, जनआशीर्वाद आणि शिवस्वराज्य यात्रा या तीन यात्रा महाराष्ट्रात सुरु आहेत. जनआशीर्वाद यात्रा बंद आहे. ही यात्रा कोणाची होती हेही लोकांना माहिती नाही. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला ठिकठिकाणी काळे झेंडे दाखविले जात आहेत. शिवस्वराज्य यात्रेचे प्रत्येक ठिकाणी स्वागत केले जात आहे. किल्ले शिवनेरीची माती कपाळी लावून शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात झाली आहे.

बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, लगेच राजीनामा देतो

‘ईव्हीइम’ असेल तर भाजपचे मंत्री आमच्या किती जागा येणार हे सांगतात. ‘ईव्हीइम’ विषयी बोललो की 40 पैशांचे लावारीस भक्त सोशलमिडियावर तुम्ही निवडून आलात. त्याचे काय विचारतात. ‘ईव्हीइम’ विषयची शंका मनात आहेच. ‘ईव्हीइम’ असल्यामुळे केवळ 60 हजार मताधिक्याने निवडून आलो. बॅलेट पेपरवर (मतपत्रिका) निवडणूक घ्या. राजीनामा देतो. नाही दोन-अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून आलो. तर नाव बदलायला तयार आहे, असेही ते डॉ. कोल्हे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like