Pune News : पुणे-अमरावती दरम्यान कुर्डुवाडी, लातूर, पूर्णा मार्गे विशेष गाड्या

एमपीसी न्यूज : पुणे ज़िल्ह्यातील नागरिकांना मराठवाडा व विदर्भात जाण्यासाठी मध्य रेल्वे पुणे आणि अमरावती दरम्यान कुर्डुवाडी, लातूर, पूर्णा मार्गे विशेष गाड्या चालवणार आहे.(Pune News) प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.

खाली दिलेल्या तपशिलानुसार प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे पुणे आणि अमरावती दरम्यान कुर्डुवाडी, लातूर, पूर्णा मार्गे विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.

01439 विशेष 16 डिसेंबर 2022 ते 26 फेब्रुवारी  2022 या कालावधीत प्रत्येक शुक्रवार आणि रविवारी पुणे येथून रात्री 10.50 वाजता सुटेल आणि अमरावती येथे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5.30 वाजता पोहोचेल.

01440 विशेष गाडी 17 डिसेंबर 2022 ते 26 फेब्रुवारी 2022 पर्यंत अमरावती येथून दर शनिवारी आणि सोमवारी संध्याकाळी 7.50 वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4.20 वाजता पोहोचेल.

Nigdi News : पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या पुढाकाराने शाळाबाह्य बालकांसाठी मोफत व्यावसायिक प्रशिक्षण

थांबे: उरुळी, दौंड जंक्शन, जिंती रोड, जेऊर, कुर्डूवाडी जंक्शन, बार्शी टाऊन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी जंक्शन, पूर्णा जंक्शन, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला जंक्शन, मूर्तिजापूर जंक्शन आणि बडनेरा जं.

संरचना: एक प्रथम वातानुकूलित, एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, 5 शयनयान, दोन गार्ड्स ब्रेक व्हॅनसह 8 सामान्य द्वितीय श्रेणी.

आरक्षण: 01439/01440 विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. 4 रोजी सर्व PRS स्थानांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. (Pune News) प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तनाचे पालन करण्याचा सल्ला रेल्वेने दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.