BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी अभिनेत्री अमृता रावने सुरू केली इको बाप्पामोरया मोहीम

एमपीसी न्यूज- मॅक्झिमस फिल्मस आणि अॅम्पल मिशनने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत भाविकांना पर्यावरण पूरक गणेश चतुर्थीचा संदेश दिला जाणार आहे. यावर्षी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव मॅक्झिमस फिल्मच्या सहयोगातून तयार केलेली नवीन शॉर्ट फिल्म #इकोबाप्पामोरया मधून प्रेक्षकांपुढे आली आहे. या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून पर्यावरण पूरक गणेश चतुर्थी आणि वसुंधरा ‌बचावचे महत्व अधोरेखित केले जाणार आहे.

अभिनेत्री अमृता रावने पुणे येथे या शॉर्ट फिल्मचे लॉंचिंग केले. यावेळी फिलांथ्रोपिस्ट आणि ग्रॅव्हिटटस फाउंडेशनच्या संस्थापिका उषा काकडे आणि बीच वॉरियर्सच्या संस्थापिका चिनू क्वाटरा यांची प्रमुख उपस्थिती होती. #इकोबाप्पामोरया या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून अमृता राव आणि मॅक्झिमस फिल्मसने पर्यावरणाचा रास रोखण्यासाठी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यांना ओशनोग्राफी तज्ञ, बीच क्लिनप स्वयंसेवक तसेच शेफ विकास खन्ना यांची साथ लाभली आहे.

या मोहिमेची माहिती देताना अभिनेत्री अमृता रावने सांगितले, “गेल्या दोन आठवड्यांपासून महाराष्ट्र आणि आसाम मध्ये अतिवृष्टीची समस्या उद्भवली आहे. हा सर्व परिणाम माणसाकडून केल्या जात असणाऱ्या पर्यावरणाच्या प्रदूषणाचा आहे. उत्सव हा प्रसंग आनंदाचा आणि उल्हासाचा असतो. परंतु या उत्सवांची प्रतिके धोकादायक रसायनांपासून बनवली जातात. ज्याचा पर्यावरणावर घातक परिणाम होतो. आता याबाबत काही कारवाई करण्याची आवश्यकता आहे. #इकोबाप्पामोरया या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही समाजाला पर्यावरण पूरक गणेश चतुर्थी साजरी साजरी करण्याचे आवाहन करत आहोत.”

फिलांथ्रोपिस्ट आणि ग्रॅव्हिटटस फाउंडेशनच्या संस्थापिका उषाकाकडे यांनी सांगितले की “आमच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविल्या जात असणाऱ्या इको बाप्पा मोरया उपक्रमातून आम्ही एक जबाबदार नागरिक म्हणून आमची जबाबदारी पार पाडणार आहोत. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याची प्रेरणा सर्व समाजापर्यंत पसरली पाहिजे. यासाठी आम्ही लहान मुलांनाही या मोहिमेत सहभागी करून घेत आहोत. गुड टच आणि बॅड‌ टच या उपक्रमातून लहान मुलांना पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे”

बीच वॉरियर्सच्या संस्थापिका चिनू क्वाटरा यांनी सांगितले की ” #इको बाप्पामोरयाच्या माध्यमातून आम्ही उत्सवाचे पावित्र्य जपण्यासह पर्यावरण रक्षणाचाही हेतू साध्य करणार आहोत. या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही तयार केलेली शॉर्ट फिल्म मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर भागांमध्येही दाखवणार आहे. अभिनेत्री अमृता राव ठिकठिकाणी गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन कार्यकर्त्यांना पर्यावरण उपक्रम राबवण्यासाठी प्रोत्साहित करेल. विसर्जनादरम्यान समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यासाठीही आवाहन करेल”

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3