Pune : अखेरच्या श्वासापर्यंत लढणारा कार्यकर्ता – गिरीश बापट

एमपीसी न्यूज : कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा 28 वर्षापासून गड (Pune) राखण्याचे काम गिरीश बापट यांनी केले. या मतदारसंघात एकदाही भाजपने पराभव पहिला नाही. पण, भाजपच्या नेत्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक जाहीर करण्यात आली. त्यावेळी हेमंत रासने यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. आजवरच्या प्रत्येक निवडणुकीत गिरीश बापट सहभागी राहणारे, प्रत्येक कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणारे, गिरीश बापट यांची तब्येत ठीक नसल्याने या निवडणुकीत दूर राहतील अशी शक्यता होती. पण, गिरीश बापट यांची तब्येत ठीक नसताना देखील त्यांनी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत संवाद ठेवण्याचे काम केले.

त्यावरच गिरीश बापट न थांबता त्यांनी केसरीवाडा येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेत भाषण देखील केले. त्यावेळी गिरीश बापट यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. बाजूला ऑक्सिजन सिलेंडर ठेवण्यात आला होता. गिरीश बापट यांचे त्यावेळचे भाषण सर्वांच्या लक्षात राहिले असून ते भाषण ऐकताना सर्वांना अश्रू अनावर झाले होते.

Girish Bapat : भाजपला तिसरा मोठा धक्का, खासदार गिरीश बापट यांचे निधन; बालेकिल्ल्याचा किल्लेदार हरपला!

गिरीश बापट (Pune) भाषण करूनच थांबले नाही. तर, व्हीलचेअरवर येऊन मतदानाचा हक्क बजावत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढविण्याच काम केले. पण, या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे लागले.

Girish Bapat : गिरीश बापट यांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं – चंद्रकांत पाटील

या सर्व घडामोडी दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध पक्षातील कार्यकर्त्यांसोबत गिरीश बापट संपर्कात राहिले. तसेच कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर विजयी झाल्यानंतर गिरीश बापट यांची भेट घेतली होती.

Girish Bapat : एकदा पराभव झाल्याने त्याच मतदारसंघात सलग पाच वेळा निवडून येणारे आमदार – गिरीश बापट

त्यावेळी गिरीश बापट यांनी त्यांना शुभेछा दिल्या होत्या. यातूनच एक कार्यकर्ता आणि नेता दिसून येतो. विरोधी पक्षातील कार्यकर्ता निवडून आल्यावर त्याला शुभेछा देणारा नेता म्हणजे गिरीश बापट आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढणारा कार्यकर्ता म्हणूनच गिरीश बापट यांची ओळख त्यांनी जपली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.